शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 21:12 IST

गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश : पूर्व विदर्भात काँग्रेसला धक्का

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. अग्रवाल हे तीनदा विधानसभा व दोनदा विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पूर्व विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.अग्रवाल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर सोमवारी सायंकाळी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केला. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री परिणय फुके यांच्यासह विविध आमदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. गोंदियाचे भाजप अध्यक्ष हेमंत पटले यांनी अग्रवाल यांचे भाजपमध्ये स्वागत केले. राजकारणात शक्ती नेहमी वाढत राहायला हवी. त्यामुळेच आपल्या परिवारासोबत बाहेरचे सक्षम लोकदेखील आले पाहिजेत. अजेय शक्ती झाली पाहिजे. परंतु बाहेरच्यांना आपले मानून सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. जुना-नवीन परिवार असा वाद नको, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा परिवर्तनाचा क्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने दाखविलेला स्नेह व साधलेला संवाद यामुळे मी भाजपमध्ये आलो. मागील पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वात विकासच झाला आहे. मी केवळ विकासासाठीच भाजपमध्ये आलो आहे. मला ‘कलाकंद’ खायचे नाही, असे मत गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.भविष्यात आणखी प्रवेश होतील : मुख्यमंत्रीयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रवाल यांच्या प्रवेशावर भाष्य केले. अग्रवाल यांचा प्रवेश झाला असला तरी अनेकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. तांत्रिक कारणांमुळे अडलेले हे प्रवेश भविष्यात होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०१४ मध्ये सुरुवातीच्या काळात सरकार काहीसे अस्थिर होते. त्यावेळीच गोपालदास अग्रवाल यांनी आम्हाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती. आम्ही त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनविले. या समितीच्या माध्यमातून तयार झालेले अहवाल स्फोटक होते व या माध्यमातून आघाडी शासनाच्या काळातील भ्रष्टाचार समोर आला. मागील पाच वर्षांपासून अग्रवाल शरीराने काँग्रेससोबत होते, परंतु मनाने आमच्यासोबतच होते, असे मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालBJPभाजपा