शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:42 IST

कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देकळमन्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.झाडे ले-आऊटमध्ये अशोक पटले नावाचा व्यक्ती राहतो. पटले सेंट्रींगचे काम करतो. असे सांगितले जाते की, काही दिवसांपूर्वी पटले यांचा काही लोकांशी वाद झाला होता. दोन्ही पक्षात मारहाण आणि शिवीगाळही झाली होती. यानंतर पटले कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. मंगळवारी रात्री शस्त्रांनी सज्ज चार ते पाच आरोपी परिसरात आले. ते पटलेबाबत विचारपूस करू लागले. ते वस्तीतील लता नागपुरे यांच्या घरी गेले. लता आणि त्यांच्या पतीने पटले यांच्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. यावर आरोपी संतापले. त्यांनी मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पतीचा मोबाईल हिसकावून नेला. नागपुरे दाम्पत्यास लुटल्यानंतर आरोपी शेजारी राहणाऱ्या शेख सलीम शेख चांदमिया यांच्या घरी गेले. त्यांनाही पटले यांच्याबाबत विचारपूस केली. सलीम यांनीही माहिती नसल्याचे सांगितले. यावर आरोपी आणखी संतापले. त्यांनी सलीमवर चाकूने हल्ला करून जखमी केले आणि लुटले. यानंतर पटले यांच्या घरी जाऊन तोडफोड केली. यामुळे लोक जमा झाले. आरोपी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. या घटनेमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. कळमना पोलिसांनी सूचना मिळताच आरोपीविरुद्ध लुटमार, मारहाण, धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी