शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

नागपूर - गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खुष खबर ! विशेष रेल्वे गाड्यांची मुदत वाढली

By नरेश डोंगरे | Updated: September 21, 2023 17:05 IST

तीन महिने, ५२ फेऱ्यांमध्ये वाढ

नागपूर : नागपूर - गोवा - नागपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूष खबर आहे. या गाड्यांच्या मुदतीसोबतच जाण्या-येण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ५२ फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.

विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाड्यांना नियोजित मुदतीनंतरही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय त्यांच्या एकूण २१२ फेऱ्याही वाढविल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्रमांक ०११३९ नागपूर - मडगाव (गोवा) विशेष द्वि-साप्ताहिक रेल्वे गाडी आधी ३० सप्टेंबरपर्यंत चालणार होती. ती आता ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या कालावधीत तिच्या २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.त्या प्रमाणे मडगाव - नागपूरच्याही ३१ डिसेंबरपर्यंत २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

ट्रेन नंबर ०१०२५ / ०१०२६ दादर बलिया दादर त्री साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या एकूण ६८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ही गाडी आता ३ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. ०१०२७/ ०१०२८ दादर गोरखपूर दादर आठवड्यातून ४ दिवस धावणाऱ्या या दोन्ही गाड्यांची मुदत २ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत या दोन्ही गाड्यांच्या एकूण ९० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

दुसरा कोणता बदल नाही

प्रवाशांची गर्दी होऊन सणासुदीच्या दिवसांत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांची मुदत तसेच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, गाड्यांची वेळ, डब्यांची (कोच) रचना तसेच थांबे यात कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे