एसटीला चांगले दिवस येण्याची शक्यता; २० संघटना आल्या एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 01:30 PM2020-09-10T13:30:25+5:302020-09-10T13:30:54+5:30

पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी २० संघटना एकत्र आल्या आहेत. एसटीला वाचविण्यासाठी संघटना एकत्र आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

Good day to ST; 20 organizations came together | एसटीला चांगले दिवस येण्याची शक्यता; २० संघटना आल्या एकत्र

एसटीला चांगले दिवस येण्याची शक्यता; २० संघटना आल्या एकत्र

Next

दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. एसटीने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून काढले. माल वाहतूक आणि खासगी गाड्यांचे टायर रिमोेडल्डिंग सुरू केले. एसटीमध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी २० संघटना एकत्र आल्या आहेत. एसटीला वाचविण्यासाठी संघटना एकत्र आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. माल वाहतूक सुरु केली. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी एसटीजवळ पैसा नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे असलेल्या निधीसाठी एसटीने आग्रह धरला. दोन महिने एसटीजवळ कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नव्हते. शासनाने दिल्यानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. महामंडळात संघटना अनेक असल्या तरी त्या आपसात भांडत असतात. परंतु पहिल्यांदा या संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांची कालच बैठक झाली. २२ पैकी १८ संघटना या बैठकीला उपस्थित होत्या. उर्वरित २ संघटनांनी या बेठकीत ठरलेल्या विषयांना अनुमती दिली. आपसातील राजकारण विसरून या संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. यामुळे एसटीला आता चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासनात विलिनीकरण व्हावे
एसटी महामंडळ हा राज्य शासनाचा उपक्रम आहे. एसटीचे कर्मचारी स्वतचा जीव धोक्यात घालून काम करतात. एसटीला तात्पुरती मदत करून भागणार नाही. त्यामुळे एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची गरज आहे.
- अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
 

 

Web Title: Good day to ST; 20 organizations came together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.