शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गोळवलकर गुरुजींचे विचार कालबाह्यच : मा. गो. वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 20:48 IST

गोळवलकर गुरुजींनी ‘बंच आॅफ थॉट’मध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशासाठी धोकादायक असल्याचे लिहिले आहे. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील संमेलनात त्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली. यात कालानुरूप मोहन भागवत यांची भूमिका योग्य असून ‘बंच आॅफ थॉट’मध्ये कालानुरूप बदल शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारवंत तथा संघाचे माजी प्रवक्ता मा. गो. वैद्य यांनी केले. याप्रसंगी वैद्य यांनी गोळवलकरांचे विचार आता कालबाह्यच ठरत आहेत, असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘बंच आॅफ थॉट’मध्ये काळानुरूप बदल शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोळवलकर गुरुजींनी ‘बंच आॅफ थॉट’मध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशासाठी धोकादायक असल्याचे लिहिले आहे. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील संमेलनात त्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली. यात कालानुरूप मोहन भागवत यांची भूमिका योग्य असून ‘बंच आॅफ थॉट’मध्ये कालानुरूप बदल शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारवंत तथा संघाचे माजी प्रवक्ता मा. गो. वैद्य यांनी केले. याप्रसंगी वैद्य यांनी गोळवलकरांचे विचार आता कालबाह्यच ठरत आहेत, असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या वतीने वैद्य यांच्या मीट द प्रेसचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.मा. गो. वैद्य पुढे म्हणाले, कालानुरूप भारतीय राज्यघटनेत अनेक बदल करण्यात आले. १९५० ते १९७६ दरम्यान सेक्युलर हा शब्द घटनेत नव्हता. त्यानंतर तो समाविष्ट केला. त्यामुळे त्यापूर्वी घटना धर्मनिरपेक्ष नव्हती असे म्हणणे चुकीचे आहे. काळानुरूप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणात बदल होत असतील त्यात काहीच गैर नाही.ते म्हणाले, राममंदिर व्हावे असे वाटते, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ते अवलंबून आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना एक राष्ट्र, एक विचार यावर अवलंबून आहे. यात भूमीशी संबंधित भावना, त्याचा इतिहास आणि मूल्यनिष्ठा यांचा समावेश आहे.मस्जिद आणि मुस्लीम यांचा एकात्मिक संबंध नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आणीबाणीनंतर देशात संघासोबत काम करणारे अनेक मुस्लीम होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात नमाज पढली आहे. अनेकदा हिंसाचारात मुस्लिमांचा संहार झाला की त्याची चर्चा होते. परंतु हिंदूंवरील हिंसाचाराची वाच्यता होत नसल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेस पक्ष टिकला पाहिजेभारतीय जनता पक्ष काँग्रेसमुक्त भारताची भाषा करीत असताना मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. ‘लोकशाहीच्या अस्तित्वासाठी दोन पक्ष असणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, इंग्लंडमध्ये दोन पक्ष आहेत. लोकशाही मजबूत होण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे,’ असे मत वैद्य यांनी व्यक्त केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर