नागपूर : सक्करदरा पोलिसांनी कुख्यात अश्विन उर्फ गोलू लिहितकर यास दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. रघुजीनगर क्वाॅर्टर येथील रहिवासी गोलू याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची सक्करदरा परिसरात दहशत आहे. त्यामुळे त्यास तडीपार करून चंद्रपूर येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.
दारूच्या तस्करीत युवकास अटक
नागपूर : कपिलनगर पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या युवकास अटक केली आहे. शुभम उर्फ कोयला प्रदीप तरकासे (२७) रा. अंगुलीमालनगर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अॅक्टिव्हावर स्वार शुभमला टेकानाका जवळ पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ ६ हजार रुपये किमतीची दारू आढळली. पोलिसांनी अॅक्टिव्हा आणि दारू जप्त करून शुभमला अटक केली. त्याच्याविरुद्ध दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............