शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धास्थानांच्या साक्षीने विदर्भामध्ये ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 05:48 IST

गावागावांत रांगोळ्या; लोकमत भवनही रोषणाईने झगमगले.

नागपूर : १५ डिसेंबर १९७१ रोजी मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीला १५ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. वाचकप्रियतेचा हा सुवर्ण महोत्सव नागपूरसह विदर्भातील श्रद्धास्थानांमध्ये भक्तिभावाचा गजर करून साजरा करण्यात आला. 

या आनंदात लोकमत परिवारासह वाचक, हॉकर्स, एजंट सारेच सहभागी झाले. विदर्भातील गावागावांत लोकमतची रांगोळी काढण्यात आली. लोकमत सुवर्ण महोत्सवाच्या आकर्षक बॉक्समध्ये ५० हजार लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने नागपुरातील लोकमत भवनावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई चित्त वेधून घेत होती.

श्री गणेश मंदिर, टेकडी येथे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते खास शुद्ध देशी तुपात तयार केलेला ५० किलो बुंदीचा लाडू व सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेला अंक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला. विधिवत आरती करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित होते. पटोले यांनी लोकमतच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीबाबत अभिनंदन करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. समीर मेघे, आ. राजू पारवे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, लोकमत वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत टाइम्सचे संपादक एन.के. नायक, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते.

सर्वधर्मसमभावाचा जागर श्री टेकडी गणेश मंदिर येथे ५० किलो बुंदीचा लाडू अर्पण केल्यानंतर विजय दर्डा यांनी रामदासपेठ येथील गुरुद्वारा, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग, होली फॅमिली चर्च व निवासस्थानी असलेल्या जैन मंदिरांत जाऊन दर्शन घेत प्रसाद व सुवर्णमहोत्सवी अंक अर्पण केला.

रांगोळी व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादलोकमततर्फे आयोजित रांगोळी व निबंध स्पर्धेसाठी हजारोंच्या संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. अजूनही ओघ सुरूच आहे. लवकरच या प्रवेशिकांचे परीक्षण करून लोकमतच्या अंकात निकाल जाहीर केला जाईल.

सुवर्ण महोत्सवी चार वितरकांचा सन्माननागपूर आवृत्तीच्या स्थापनेपासून ते सुवर्ण महोत्सवाचा सोहळा साजरा होईपर्यंत नागपुरात अंक वितरणाची धुरा सांभाळणाऱ्या टिळक पुतळा येथील प्रभाकर हलमारे, तुकडोजी पुतळा येथील भोजराज उरकुडे, प्रतापनगर येथील श्रीराम माटे व रामदासपेठ येथील वासुदेव भटारकर या चार प्रमुख वितरकांचा यावेळी विजय दर्डा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या चारही वितरकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. विजय दर्डा यांनी या चारही वितरकांना यावेळी प्रसादरूपी ५० किलो लाडूच्या अग्रपूजेचा मान देत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरLokmatलोकमत