शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 20:56 IST

आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देआर.आर. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आर.आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी धम्माचा प्रचार, आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्यासाठी जीवाचे रान केले, खस्ता खाल्ल्या. त्यांचे कार्य व्यर्थ जाणार नाही. आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रघुनाथराव ऊर्फ आर. आर. पाटील यांच्या २६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात त्यांच्या तैलचित्राचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. राजेंद्र पाटील, हरिदास टेंभुर्णे, स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे तसेच आर. आर. यांचा मुलगा वसंतराव पाटील, स्नुषा हेमलता पाटील आणि मुलगी नलिनीताई पुडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, माणसे स्वत:साठी जगतात पण काही लोक स्वत:सोबत इतरांच्या, समाजाच्या भल्यासाठी जगतात. आर. आर. पाटील हेही समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार रुजविण्यासाठी अनमोल असे कार्य केले. केवळ स्वत: नाही तर संपूर्ण कुटुंब त्यांनी या कार्यासाठी वाहून घेतले. त्याग आणि बलिदानाशिवाय काहीच मिळत नाही. बाबासाहेबांच्या त्यागामुळे कोट्यवधी समाजाला सन्मानाचे जीवन मिळाले. त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन पाटील यांनीही स्वत:ला चळवळीत झोकून दिले आणि त्यासाठी मृत्यूपर्यंत कार्य केले. ते खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे सेनापती होते, असे गौरवोद््गार प्रा. कवाडे यांनी काढले.अ‍ॅड. राजेंद्र पाटील आणि हरिदास टेंभुर्णे यांनीही पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एम्प्रेस मिलमध्ये नोकरी मिळाल्यापासून भानखेड्यात वास्तव्य असताना आंबेडकरी चळवळीशी जुळलेला त्यांचा संबंध, स्वतंत्र मजूर पक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख म्हणून केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी आणि पुढे दीक्षाभूमी व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत असलेल्या त्यांच्या योगदानाचाही उलगडा या ज्येष्ठ विचारवंतांनी केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश बहादुरे यांनी केला तर वसंतराव पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी