आनंद शर्मा
नागपूर : सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीवर आता ब्रेक लागला आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्क कमी केल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे दहा ग्रॅम शुद्ध सोने १३०० रुपये आणि किलो चांदीत ४,५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसमारंभ आणि अन्य विशेष प्रसंगासाठी सोने-चांदी आणि दागिन्यांच्या खरेदीची संधी आहे.
जेम्स अॅण्ड ज्वेलरी कौन्सिलचे संचालक राजेश रोकडे आणि प्रदीप कोठारी म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मंदीचे वातावरण आहे. किमतीत सरासरी ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर बजेटमध्ये सीमाशुल्कात कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर झाला आहे. भाव बरेच कमी झाले असून आणखी कमी होण्याची शक्यता नाही. अशावेळी लग्नसमारंभ आणि अन्य विशेष समारंभासाठी दागिन्यांची खरेदी आणि गुंतवणुकीची हीच वेळ आहे.
असे कमी झाले सोने-चांदीचे भाव :
तारीखसोने चांदी
१ फेब्रु. ४९,१००७३,०००
२ फेब्रु. ४८,७००७१,०००
३ फेब्रु. ४८,५००६९,०००
४ फेब्रु. ४८,०००६७,०००
५ फेब्रु. ४७,८००६७,५००