शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

वन कर्मचाऱ्यांवर सुवर्ण पदकांचा वर्षाव

By admin | Updated: August 19, 2014 00:58 IST

जीवाची पर्वा न करता, वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या राज्यभरातील धाडसी व कर्तबगार वन अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात यंदा नागपूर

कर्तृत्वाचा गौरव : सोनटक्के यांना सुवर्ण, बैस यांना रजतनागपूर : जीवाची पर्वा न करता, वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या राज्यभरातील धाडसी व कर्तबगार वन अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात यंदा नागपूर वनवृत्तातील वन कर्मचाऱ्यांवर अक्षरश: सुवर्ण पदकांचा वर्षाव झाला आहे. यामध्ये वनक्षेत्रपाल डी. एस. टेकाडे, वनपाल अभिलाषा सोनटक्के व वनरक्षक सी. एस. शाहू यांना सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. तसेच विभागीय वन अधिकारी एस. व्ही. रामराव व वनरक्षक प्रदीपसिंग बैस यांना रजत पदक मिळाले आहे. याशिवाय गडचिरोली वनवृत्तातील विभागीय वन अधिकारी ए. श्रीलक्ष्मी, वनपाल एस. एम. गाजलवार, वनरक्षक व्ही. आर. गोल्लेवार व जी. सी. बोळा यांच्यासह चंद्रपूर येथील उपवनसंरक्षक आर. टी. धाबेकर, वनक्षेत्रपाल विवेक मोरे, वनपाल एन. एन. बोधे, बंडू लालसरे, व्ही. डी. गलगट व व्ही. एस. मोरे यांचा समावेश आहे. येत्या २१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे आयोजित एका राज्यस्तरीय समारंभात राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. राज्य शासनातर्फे प्रत्येक पाच वर्षांनंतर उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यासाठी संबंधित मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून वनरक्षक ते उपवनसंरक्षक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या शिफारशींसह त्यांच्या कामाचे स्वरूप, गोपनीय अहवाल, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा अहवाल मागविल्या जातो. त्यानुसार २०१२-१३ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच १३ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यात राज्यभरातील एकूण ३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण पदके, १६ जणांना रजत व एका वनरक्षक कर्मचाऱ्याला मरणोत्तर विशेष पदक प्रदान करून गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)बैस यांची ‘हॅट्ट्रिक’ सेमिनरी हिल्स येथे वनरक्षकपदी कार्यरत प्रदीपसिंग बैस यांनी यंदाच्या रजत पदकासह पुरस्कारांची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या सेवाकाळात सतत दोन सुवर्ण व एक रजत पदक पटकाविले आहे. त्यांची नागपूर वन विभागात ‘आॅपरेशन स्पेशालिस्ट’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कोणतेही सिक्रेट आॅपरेशन यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानल्या जाते. या बळावर त्यांनी आतापर्यंत अनेक शिकाऱ्यांना गजाआड केले आहे. शिवाय नुकत्याच दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजलेल्या कोब्रा नागाच्या विषासह आरोपींना रंगेहात पकडण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तसेच वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाईत ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. कदाचित शासनाने त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन, यंदा पुन्हा रजत पदक जाहीर केले आहे. शिवाय लकडगंज येथील वनपाल अभिलाषा सोनटक्के या सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राज्यभरातील पहिल्या महिला वन कर्मचारी ठरल्या आहेत.