शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सोन्याची विक्रमी उसळी; जीएसटीसह भाव ६९,२०० रुपये

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 21, 2024 20:26 IST

- आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम : २० दिवसात चार हजारांची झळाळी

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे नागपूर सराफा बाजारात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव तीन टक्के जीएसटीसह ६९,३०० रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याची सततची वाढ इथेच थांबणार नाही. लवकरच ७० हजाराचा आकडा गाठणार असल्याचे मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाववाढीमुळे लोक आवश्यक प्रसंगासाठी सोने खरेदी करीत आहेत.

सोन्याच्या दरात जगभरात अचानक तेजी आली आहे. मार्च महिन्यात सोन्यात कमालीची वाढ झाली आहे. तीन टक्के जीएसटीसह ४,१२० रुपयांनी वाढले. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर लग्नसराई आणि अन्य कारणांसाठी खरेदी करणाऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मार्च महिन्यात जीएसटीविना सोन्याच्या किमती पाहिल्यास १ मार्चला दर ६३,२०० रुपये, २ मार्चला ६३,९००, ५ मार्चला ६५,१००, ९ मार्चला ६५,९०० रुपये, त्यानंतर १८ मार्चपर्यंत सोन्याचे दर ६५,५०० ते ६५,७०० रुपयांदरम्यान होते.

१८ मार्च रोजी सकाळच्या सत्रातच सोन्याच्या किमतीने ६६ हजारांचा विक्रमी आकडा गाठला होता. हे भाव २० मार्चपर्यंत कायम होते. मात्र, २१ मार्च रोजी सकाळच्या सत्रात अचानक १,२०० रुपयांनी भाव वाढून ६७,२०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर दुपारी पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६७,३०० रुपयांवर पोहोचली. त्यानंतर १०० रुपयांची घसरण होऊन भाव पुन्हा ६७,२०० रुपयांपर्यंत उतरले. सोने ७० हजारांचा आकडा गाठणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज खरा होताना दिसत आहे.

दिनांक सोन्याचे दर (जीएसटीविना)

१ मार्च ६३,२००२ मार्चला ६३,९००५ मार्चला ६५,१००९ मार्चला ६५,९००१८ मार्च ६५,७००१८ मार्च ६६,०००२० मार्च ६६,०००२१ मार्च ६७,२००

टॅग्स :Goldसोनं