शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रसिद्ध ब्युटी पार्लरमधून सोने व हिरेजडित दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:55 IST

ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपावणेतीन लाखांचा ऐवज : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.श्रेयस मेहाडिया (रा. गोदरेज आनंदम) यांनी बजाजनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पूजा मेहाडिया तसेच मामांची सून वर्षा अग्रवाल या दोघी अत्रे लेआऊटमधील चेंज सलूनमध्ये २३ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता आल्या. फेशियल करतेवेळी पूजा यांनी त्यांच्या कानातील सव्वादोन लाखांच्या हिरेजडित सोन्याच्या रिंग तसेच वर्षा यांनी त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट आपापल्या पर्समध्ये काढून ठेवले. फेशियल आटोपल्यानंतर त्यांनी सलूनमध्ये एकूण २६०० रुपये दिले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पर्समध्ये दागिने तपासले असता त्यात ते आढळले नाही. या दागिन्यांसोबतच वर्षा यांच्या पर्समधील २ हजार रुपयेही चोरीला गेले होते. त्यामुळे पूजा आणि वर्षा यांनी सलून मालकाकडे दागिने तसेच रकमेबाबत विचारणा केली. त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे या दोघींनी आपापल्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. श्रेयस यांनी लगेच मामांसोबत सलून गाठून सलूनच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी या दोघींकडे दागिने असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. आतमध्ये मात्र सीसीटीव्ही नसल्याने ते दागिने कुणी चोरले, ते स्पष्ट झाले नाही. श्रेयस यांनी बजाजनगर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेला ४८ तासांपेक्षा जास्त अवधी होऊनही चोरट्यांचा छडा लागला नव्हता.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी