शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सोने ११०० व चांदीत ११ हजाराची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:37 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय मार्केटनुसार भाववाढसोने ५१ हजार, चांदी ६१,५००भाववाढीवर भाष्य कठीण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. चांदीचा तुटवडा आणि खाणी बंद असल्यामुळे सोन्याचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातुलनेत संपूर्ण जगात या दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. भाव किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. पण वाढत्या किमतीनंतरही लोकांनी खरेदी वाढविल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.जुलै महिन्यात २३ दिवसात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १,१०० रुपयांनी तर चांदीचे भाव तब्बल ११ हजारांनी वाढले आहेत. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५१ हजारांवर पोहोचले आहेत. १९ जुलैला चांदी प्रति किलो २,५०० रुपये, २१ जुलैला ५,३०० रुपये आणि २३ जुलैला १,२०० रुपयांची वाढ होऊन ६१,३०० रुपयांवर स्थिरावली. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीवर ३ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्यात येत आहे. भाववाढीमुळे सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, भाववाढीनंतरही लोक खरेदीसाठी सराफांकडे जात आहेत. आंतररराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत दररोज भाव बदलत आहेत. दररोज होणारी भाववाढ सराफांच्या हातात नाही. भाव वाढत असतानाही दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे. भाववाढीवर भाष्य करणे कठीण आहे. भाववाढीमुळे सराफांची दुकानेही धोकादायक झाली आहेत.नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, सोने-चांदीचे दर का वाढत आहेत, यावर बोलणे कठीणच आहे. पण मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दरवाढ सुरू आहे. व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांनीही खरेदी वाढविल्याने भाववाढ झाली आहे.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInflationमहागाई