शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरही आता राजकारणातला कार्यकर्ता झालाय! सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले

ठळक मुद्देराजकारण नुसते भ्रष्टच नाही तर दुष्टही झाले आहेदहादिवसीय युगांतर व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले आणि आता ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न पडत असल्याची राजकीय कोटी करत ज्येष्ठ साहित्यिक व लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी राजकारणाचे विश्लेषण केले. राजकारणात धर्म आल्यापासून ईश्वरही राजकारणातला कार्यकर्ता झाला असावा, असा पक्का समज झाल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशिवार यांच्या दहादिवसीय युगांतर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी त्यांनी ‘राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफले.महात्मा गांधी आणि कौटिल्याने राजकारणावर केलेल्या व्याख्या सांगतानाच, त्यावरील विश्लेषण द्वादशीवार यांनी यावेळी केले. महात्मा गांधी यांनी ईश्वराच्या उपासनेचा प्रमुख मार्ग म्हणून राजकारणाचा मार्ग निवडला होता. तर, कौटिल्याने राजनिती व लोकनिती असे दोन विभाग करत राजसत्तेसाठी राजकारण असल्याचे सांगितले होते. राजकारणात सत्तास्थापित करताना अबाधित ठेवण्यासाठी व विस्तारित करण्यासाठी जो आडवा येईल, त्याला ठेचण्याचा उपदेश केला. या दोन मार्गापैकी वर्तमानातील राजनेते कौटिल्याचीच उपासना करत असल्याची टिका द्वादशिवार यांनी यावेळी केली. नेहरूंपर्यंत राजकारण महात्मा गाधी यांच्या अध्यात्मावर चालत होते. नंतर मात्र सत्तेचे सामूहिक राजकारणात रूपांतरण झाले. वर्तमानात पुन्हा एकदा सत्ता एकहाती आली तरी त्यांचे केंद्र स्वार्थात असल्याचे ते म्हणाले. राजकारणाचे एक एक पैलू उलगडताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रहारही केले. एकेकाळी रस्त्यावर असलेला नेता नंतर शेकडो-हजारो कोटींचा मालक होतो.कोणताही उद्योग-व्यवसाय नसताना हे कसे शक्य होते? ७८ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असलेला नेता एका रात्रीत पक्षांतर करताच शुद्ध होतो, त्याला उपमुख्यमंत्रीही बनविले जाते आणि तो पुन्हा माहेरी परतल्यावर त्याच्या घोटाळ्याचे पुनरूज्जीविकरण कसे करायचे, यावर चर्चा सुरू होते. कोणता खासदार कोणाच्या पे रोलवर संसदेत पोहोचतो, गोरदेजला २६ हजार कोटीचे कंत्राट दिले नाही म्हणून मुख्यमंत्र्यावर दिल्ली राग का करते, क्रिकेट बोर्डावर राजकीय नेते शरद पवार, लालू प्रसाद यादव कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी राजकारणाचे अनेक चांगले व मलिन पैलू उपस्थितांसमोर उलगडले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. स्वागत श्रीराम काळे यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर