शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'व्हॅलेंटाईन गिफ्ट'चा महिमा अपार : हटके 'गिफ्ट'च्या शोधात तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:28 IST

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे.

ठळक मुद्देअनोख्या भेटवस्तू देण्याकडे विशेष जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ‘यंगिस्तान’ साठी तर तो विशेष संशोधनाचाच विषय. अभ्यासालादेखील देणार नाही इतका वेळ या संशोधनासाठी देण्यात येतो. ‘हे घेऊ की ते’, ‘तिला काय वाटेल’, ‘इट मस्ट बी युनिक’ अशा प्रकारचे विचार काही आठवड्यांपासून मनात घोळत असतात. मग काय तर याकरिता महाविद्यालये, शिकवणी वर्ग, रेस्टॉरंटस् इत्यादी ठिकाणी प्रेमवीरांच्या विशेष ‘राऊंड-टेबल कॉन्फरन्स’देखील होतात. बरे फेसबुक अन् ‘स्काईप’वरदेखील याचीच चर्चा. असा हा गिफ्टस्चा महिमा.यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’साठी नेहमीप्रमाणेच तरुणाई सज्ज झाली आहे. आता ‘गिफ्टस्’ द्यायची वेळ आली म्हणजे थोडे ‘टेन्शन’ तर येणारच. पण चलता है यार! बरे गिफ्ट घेताना खिशाकडेही लक्ष ठेवावे लागते. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर हा ‘मोठ्ठा’ प्रश्न निर्माण होतोच आणि त्यातून निरनिराळे मार्गदेखील काढले जातात. ‘गिफ्ट’ कुठलेही असो पण प्रत्येकाचा उद्देश एकच असतो, ‘समोरच्या व्यक्तीच्या चेहºयावर हास्य आणि मनातील प्रेमाच्या तारांना साद घालणे’. जागतिकीकरणामुळे जवळ आलेल्या जगात मागील वर्षी जो भेटवस्तूंचा ‘ट्रेंड’ होता तो यंदा असेलच असे नाही. बाजारात गेल्यानंतर ‘कुछ ट्रेंडी, कुछ फन्की’ अशा अनेक भेटवस्तू दिसून येतील. अनेक भेटवस्तू तर खरोखरच प्रेमात पडाव्यात अशाच आहेत.सबकुछ ‘रेड अ‍ॅन्ड पिंक’

बाजारात गेल्यानंतर हमखास तरुणाईचे अड्डे असणाऱ्या दुकानांमध्ये लाल आणि गुलाबी रंगांची उधळण होताना दिसते आहे. फूल असो, गिफ्ट असो, टेडीबिअर असो किंवा पेन. इतकेच काय पण ‘गिफ्ट पॅकिंग’ पेपरदेखील याच रंगांमध्ये दिसून येत आहे. शेवटी प्रेमाच्या रंगातील भेटवस्तूच प्रेम करणाऱ्यांच्या मनाला जास्त भावतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.‘टी-शर्ट’वरच प्रेमाचा संदेश
आवडत्या व्यक्तीचा फोटो एखाद्या सुंदर व आकर्षक फ्रेमसोबत भेट देण्याचा ‘ट्रेन्ड’देखील दिसून येत आहे. अगदी १०० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत निरनिराळ्या आकाराच्या फ्रेम्स उपलब्ध आहेत. याशिवाय फोटोचे पझल्स, कप व पेपरवेटवरील फोटोचे प्रिंटिंग इत्यादी भेटवस्तूंचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. टी-शर्टस् किंवा रुमालावरदेखील प्रेमाचा संदेश तसेच फोटो प्रिंट करण्याची सोय उपलब्ध असल्याने अनेकांनी तो पर्यायदेखील स्वीकारला आहे. गोकुळपेठ, सीताबर्डी, सदर येथील दुकानांमध्ये याकरिता गेल्या दोन आठवड्यांपासून तरुणांची गर्दी दिसून येत आहे. शिवाय अनेक ‘आॅनलाईन’ संकेतस्थळांनीदेखील ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.‘चॉकलेट’ तो मांगता ही है...‘व्हॅलेंटाईन’च्या आठवड्यात तरुणाईने ‘चॉकलेट डे’ साजरा केला असला तरी प्रेमाची भेट देताना चॉकलेटलादेखील मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात येत आहे. हार्टच्या आकाराची चॉकलेटस्, विदेशातून आयात करण्यात आलेल्या ‘टॉफीज्’ यांना मोठी मागणी आहे. अनेकांनी तर विशेष आॅर्डर्स देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाची चॉकलेटस् बनवून घेतली आहेत.पूर्वसंध्येला बाजारात उत्साहआपल्या प्रियजनांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देण्यासाठी शहरातील निरनिराळे मॉल्स व गिफ्ट शॉप्समध्ये गर्दी दिसून आली. ग्रीटिंग कार्ड, टेडिबिअर, आकर्षक ज्वेलरी, डिझानयर वॉच, संगीतमय थ्रीडी बुकलेटस्, लव्ह मीटर, हार्टच्या आकाराचे कुशन्स इत्यादी प्रकारच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देण्याकडे कल दिसून येत आहे.‘रेड रोझ’ प्रेमवीरांसाठी ‘एव्हरग्रीन’
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रियकराने प्रेयसीला कुठलेही ‘गिफ्ट’ दिले तरी शेवटी प्रत्येक जण ‘रेड रोझ’ सोबत देतोच. प्रेमाचे प्रतीक असलेले टवटवीत असे गुलाबाचे फूल पाहून प्रेयसीच्या गालावरदेखील नकळतपणे गुलाबी छटा उमटते आणि दोघांचेही ‘दिल गार्डन गार्डन’ होते. बाजारातील फुलमार्केटमध्ये बाहेरून मागविण्यात आलेल्या गुलाबांना मोठी मागणी असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली आहे. चौकाचौकात गुलाबाच्या फुलांनी व पुष्पगुच्छांनी दुकाने सजलेली आहेत. शुक्रवारी फुलांचे दर महाग होतील या शक्यतेने अनेक प्रेमवीरांनी गुरुवारीच ‘रेड रोझ’ खरेदी केले, हे विशेष.विवाहित ‘कपल्स’साठी टिप्स

  • जर विवाहित असाल तर जोडीदाराला सकाळी उठल्यावर लगेच छानसे टवटवीत गुलाबाचे फूल व भेटवस्तू द्या.
  • शक्य असेल तर सुंदर असे ग्रीटिंग कार्ड द्या.
  • एकमेकांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • पत्नीला सकाळी बिछान्यावरच गरमागरम कॉफी देऊन आश्चर्याचा धक्का द्या.
  • संध्याकाळी जोडीदारासोबत मस्त फिरायला जा.
  • जोडीदाराला आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा.
  • एखादे छानसे ‘सरप्राईज’ देण्याचा प्रयत्न करा.
  • एखादी प्रेमळ कविता किंवा ‘लव्ह लेटर’ देऊन मनातील भावना व्यक्त करा.
  • एखादा रोमॅन्टिक सिनेमा किंवा नाटकाला जा.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेnagpurनागपूर