शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:19 IST

२००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते. सद्यस्थितीत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यांची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहे. पुढील दोन वर्षात जर्मनी तर पाच वर्षांत जपानला भारत सहज मागे टाकेल, असे डॉ.ए.एम.गोंडाणे म्हणाले. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पं.जवाहरलाल नेहरू यांनी रचला. त्यानंतर वेळोवेळी परराष्ट्र धोरणात बदल होत गेला. देशातील स्थानिक परिस्थितींनुसार परराष्ट्र धोरण ठरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थितीनुसार परराष्ट्र धोरणाची आखणी होते. सोबतच देशाच्या आवश्यकतेनुसार परराष्ट्र धोरणाची भूमिका घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.दूतावासात काम करत असताना राजदूतांना दोन देशांमधील राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे यावर भर द्यावा लागतो. एखादा वाद असेल तर तोदेखील सामंजस्यानेच सोडविण्याची भूमिका असते. आजच्या घडीला जगातील विविध देशांमध्ये भारतीय मूळाचे तीन कोटींहून अधिक लोक राहत आहेत. अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. हे भारतीय नागरिक देशाची खरी ताकद बनू शकतात, असे ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनीदेखील यावेळी आपले मनोगत मांडले. तर डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर