शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 22:16 IST

Climate Change News: विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला आहे. होलोसीन युग म्हणजेच सुमारे अकरा हजार वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती.

- योगेश पांडे नागपूर  - विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला आहे. होलोसीन युग म्हणजेच सुमारे अकरा हजार वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती. मात्र आता जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे उर्जा साधनांमध्ये तत्काळ बदलांची आवश्यकता आहे, असे मत आयआयटी-दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी ‘सीएसआयआर’चा ८३ वा स्थापना दिवस साजरा झाला. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

‘नीरी’च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.अतुल वैद्य, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यातील संकटांचा सामना करायचा असेल तर शाश्वत विकास उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी कसे होईल यावर भर दिला गेला पाहिजे. त्यासाठी उर्जा प्रणालींमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आणि त्याचे सामाजिक तसेच आर्थिक परिणाम स्पष्टपणे समजून घेतले गेले पाहिजे. आपल्या वैज्ञानिक ज्ञानात अजूनही बरीच उणीवा आहेत. त्या दूर करून नवकल्पना प्रत्यक्षात आणायला हव्यात. वायू प्रदूषण, हवामान बदल आणि ऊर्जा प्रणालींचे सखोल विश्लेषण हे शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे प्रा.बॅनर्जी म्हणाले. आयआयटी-दिल्ली व सीएसआयआर नीरी यांच्यात सोबत काम झाले पाहिजे असा मानस त्यांनी व्यक्त केला. डॉ.अतुल वैद्य यांनी ‘सीएसआयआर’च्या कामगिरीवर प्रकाश टाकला. समाज हितासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता व तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

आज संतुलित वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे. मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर करून हवामान बदल आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापन यासारख्या समस्यांना तोंड देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ.देबिश्री खान यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. यावेळी नीरीतील सेवानिवृत्त तसेच कार्याची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पर्यावरण पत्रिकाची ई आवृत्ती आणि ‘बांबू डायव्हर्सिटी इन इंडिया अँड इट्स रोल इन सरफेस इरोशन कंट्रोल’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. 'जिज्ञासा' उपक्रमांतर्गत आयोजित 'सूक्ष्म संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ‘सीएसआयआर’च्या स्थापनादिवसानिमित्त नागपूर आणि विदर्भातील ५९ शाळा आणि महाविद्यालयातील अंदाजे ३,१३२ विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली.

टॅग्स :nagpurनागपूरweatherहवामान