शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

भावाला दिले जीवदान; रक्षाबंधनाची अनोखी भेट; झाले लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:10 IST

यकृत देऊन बहिणीने विणला मायेचा धागा!

नागपूर : राखीपौर्णिमेला भावाच्या हाती बहीण बांधते मायेचा धागा. बहिणीला भाऊही भेट देतो, पण तिच्या भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जिवावर उदार होत, तिने भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढले. १५ दिवसांच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हॉस्पिटलमधून घरी परतले. ती आज, रविवारी त्याला ओवाळणार आणि राखी बांधणार!

निकिताचा भाऊ प्रणय कुºहाडकर (२४) याचे यकृत निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तातडीने यकृत प्रत्यारोपण न झाल्यास जिवावर बेतू शकते, असा इशाराही दिला. गरीब कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली. आजारातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशा प्रणयने सोडून दिली होती. याची माहिती मित्रांपर्यंत पोहोचताच पैशांची जुळवाजुळव सुरू झाली.

यकृतदानासाठी त्याच्या आईने पुढाकार घेतला, परंतु रक्तगट जुळत नव्हता. काय करावे, या विवंचनेत असताना लहान बहीण निकिता समोर आली. ‘मी देते यकृत,’ एवढेच ती म्हणाली, घरच्यांनी तुझे लग्न व्हायचे आहे, असे सांगून तिला चूप केले, परंतु डॉक्टरांनी निकिता हीच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. आम्हा दोघांना काहीच होणार नाही, हे निकिताने कुटुंबीयांना पटवून दिले. त्यानंतर, न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे ‘लाइव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ झाले.बहिणीला पुन्हा भाऊ मिळालाअडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा, साथ न सोडणारा, समजूतदार प्रेमळ असा भाऊ असावा, असे बहिणींना वाटते आणि एखादी भोळीभाबडी, सुंदर मनाची,खट्याळ-खेळकर अशी बहीण असावी, असे भावाला वाटते. अनेकांच्या या इच्छा पूर्णही होतात, परंतु काळ येतो आणि दोघांची परीक्षा घेतो, तेव्हा भावाचे निरागस ‘प्रेम’ आणि बहिणीची अफाट ‘माया’चे वास्तव समोर येते. २३ वर्षीय निकिताच्या समोरही काळ आला होता. तिने भावावरची अफाट माया सिद्ध करून दाखविली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखी