शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाला तीन कोटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:24 IST

शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आवश्यक खर्च भागविण्यासाठी येत्या मार्चपर्यंत तीन कोटी रुपये देण्यात यावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : खर्च भागवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आवश्यक खर्च भागविण्यासाठी येत्या मार्चपर्यंत तीन कोटी रुपये देण्यात यावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.विद्यापीठासंदर्भात असोसिएशनची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे हे विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथील ७५ एकर जमीन देण्यात आली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सध्या हे विद्यापीठ सिव्हिल लाईन्स येथील ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जोती) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरू आहे. पहिल्या वर्षी विद्यापीठातील एल.एल.बी. अभ्यासक्रमात ६० तर, एल.एल. एम. अभ्यासक्रमात १० विद्यार्थी होते. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यापीठाला खर्च भागवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता सरकारला विद्यापीठास तीन कोटी देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती असोसिएशनने न्यायालयाला केली आहे. असोसिएशनतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक कामकाज पाहात आहेत.

टॅग्स :National Law Universityनॅशनल लॉ युनिव्हर्सिटीnagpurनागपूर