शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा द्या, विम्याचे संरक्षण द्या!

By योगेश पांडे | Updated: December 12, 2023 18:23 IST

विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली.

नागपूर : विदर्भात विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे व हजारो शेतकरी या पानांचे उत्पादन करतात. अवकाळी पावसाचा संबंधित शेतकऱ्यांनादेखील फटका बसतो. मात्र याला कृषी पीक म्हणून मान्यताच नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली. नियम ९७ अन्वये अवकाळी पावसावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते.

विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप आहे. पानपिंपरीतून आयुर्वेदिक औषधे तयार होता. हजारो शेतकरी याचे उत्पादन घेतात. मात्र ते हवालदील झाले आहेत, याकडे दटके यांनी लक्ष वेधले. पीक विमा कंपन्यांकडून नागपुरातील काही शेतकऱ्यांना १२, ५२, ५६ रुपयांची रक्कम देण्यात आली. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालावे, कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये अशी मागणी त्यांनी केली.

- मिटकरींची मागणी, अधिवेशन वाढवाअमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिेवशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील मुद्द्यांवर व्हावे यासाठी भरवले जाते. मात्र विदर्भाच्या मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, असे ते म्हणाले.

- पीक विमे कंपन्यांचे फायद्यासाठी?पीक विमे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी असतात. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे पिक विमा हे कंपनीचे फायद्यासाठी असतात का? असा सवाल यांनी अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी प्रज्ञा सातव यांनी सुद्धा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर