शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला एक हजार कोटी अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:51 IST

आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एसटीला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एसटीला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.कोरोनामुळे एसटीत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास उशीर होत असून मे महिन्याचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्यात रोष पसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात एसटीला सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक हजार कोटींचे अनुदान द्यावे, मे महिन्याचे वेतन त्वरित द्यावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, देशातील इतर राज्याप्रमाणे प्रवासी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारावा, टोल टॅक्स, मोटार वाहन कर माफ करावा, डिझेलवरील व्हॅट कर माफ करावा, परिवर्तन बस खरेदीसाठी शासनाने आर्थिक साहाय्य करावे, खाजगी कंत्राटे रद्द करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)चे प्रादेशिक सचिव अरुण भागवत, विभागीय अध्यक्ष प्रवीण डफळे, विभागीय सचिव सुनील राठोड, विभागीय कार्याध्यक्ष शरद पोयाम, विभागीय कोषाध्यक्ष विनोद चव्हाण, दिलीप रणदिवे, गुणवंत कवडे, दीपक बागेश्वर, प्रवीण बिंड, संजय करडभाजने, शरद साबळे, माधव झोडे यांचा समावेश होता.

टॅग्स :state transportएसटीfundsनिधी