शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल थकबाकीदारांची नावे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:00 IST

शहरामध्ये वीज बिल थकबाकीदार किती आहेत, त्यांच्याकडे किती वीज बिल थकीत आहे व वीज बिलाची थकबाकी वसूल करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याची विस्तृत माहिती दोन आठवड्यात सादर करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरण व स्पॅन्को कंपनीला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : महावितरण, स्पॅन्कोला मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये वीज बिल थकबाकीदार किती आहेत, त्यांच्याकडे किती वीज बिल थकीत आहे व वीज बिलाची थकबाकी वसूल करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याची विस्तृत माहिती दोन आठवड्यात सादर करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरण व स्पॅन्को कंपनीला दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वीज बिल थकबाकीदारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन हा आदेश दिला. हायटेन्शन वीज लाईनपासून नियमानुसार अंतर सोडून बांधण्यात आले नाहीत अशा घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पुढील कामकाज करण्यासाठी आवश्यक रक्कम देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने महावितरण, स्पॅन्को, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व महापारेषण यांना दिला होता. त्यानुसार, महावितरण, स्पॅन्को, महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये समितीकडे जमा केले. महापारेषणने रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने महापारेषणला ही रक्कम समितीकडे जमा करण्यासाठी आणखी एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला. आरमर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगरात अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनमुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांनी कामकाज पाहिले.समितीला रविभवनात बंगलाविधिमंडळ अधिवेशनामुळे समितीला रविभवनातील बंगल्यातून दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले होते. अधिवेशन संपल्यामुळे समितीला परत रविभवन येथे बंगला देण्यावर निर्णय घेण्यात यावा असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. या प्रकरणावर आता २९ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण