शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाराष्ट्र दिनापूर्वी मराठीला द्या अभिजात भाषेचा दर्जा अन्यथा..; साहित्यिकांचा इशारा

By निशांत वानखेडे | Updated: April 19, 2023 14:48 IST

साहित्यिकांची सामूहिक चळवळ

नागपूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पून्हा एकदा साहित्य क्षेत्राकडून व्यापक माेहीम राबविली आहे. येत्या १ मे राेजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वी मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा इशारा महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून दिला जात आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने टाळाटाळ चालविली आहे. या पार्श्वभूमीवर अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या 'मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समिती ' द्वारे आणि महेश केळुसकर यांनी पुढाकार घेऊन केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना जे पत्र नुकतेच पाठवले आहे. याला पाठींबा देत ‘मराठीच्या व्यापक हितासाठी’ राज्यातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार यांनी व्यापक माेहीम राबविली आहे. ३० एप्रिल राेजी मागणी पूर्ण करा, अन्यथा १ मे राेजी काळ्या फिती लावून सार्वजनिकरित्या निषेध करण्याचा इशारा यात दिला असून समग्र मराठी भाषिक समाजाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गज्वी आणि केळुसकर यांनी पुढाकार घेतलेल्या या मोहीमेमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी, रंगनाथ पठारे (अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती), रामदास फुटाणे (अध्यक्ष, जागतिक मराठी अकादमी) वसंत आबाजी डहाके (पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ), लक्ष्मीकांत देशमुख (पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ.रामदास भटकळ ( लेखक-प्रकाशक), कौतिकराव ठाले-पाटील (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद), रवींद्र शोभणे (कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ), कपूर वासनिक (अध्यक्ष, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद), वामन पंडित (वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग), डॉ.प्रदीप कर्णिक (मराठी संशोधन मंडळ), भिकू बारस्कर, (अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, कल्याण), रजनीश राणे (संस्थापक, मराठी आठव दिवस), डॉ.हरिश्चंद्र बोरकर (संस्थापक, झाडी बोली साहित्य मंडळ), डाॅ. यशवंत मनोहर, दादा गोरे, बाबा भांड, रोहिणी हट्टंगडी, किशोर कदम 'सौमित्र', अरुणा सबाने, सुनील कर्णिक, डॉ.अनुपमा उजगरे, ज्ञानेश महाराव, सुषमा देशपांडे, प्रतिमा जोशी, दिपक राजाध्यक्ष, राकेश सारंग, विजय केंकरे, राजीव जोशी, गिरीश पत्के, डॉ.सुरेश मेश्राम, युवराज मोहिते, सुनील महाजन, अरुण घाडीगांवकर, रवींद्र पाथरे, भालचंद्र कुबल, ताराचंद्र खांडेकर, प्रतिभा सराफ, प्रशांत वांद्रे, जनार्दन लवंगारे, विजय तारी, अविनाश गायकवाड, डॉ. महेंद्र भवरे, डॉ.अनिल सपकाळ, राकेश शिर्के, राजू तुलालवार, श्रीकृष्ण काकडे, डॉ.अनिल बांदिवडेकर, सतीश नाईक, डॉ. सतीश पावडे, डॉ.निशा शेंडे, डॉ.आशा मुंढे, भगवान हिरे, अजय कांडर, प्रा.अनिल सोनार, मंगेश विश्वासराव या मान्यवरांनी सहभाग नोंदवला असून सर्वच लेखक, कलावंत, पत्रकार, चित्रकार, व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर ,वकील आदींनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीnagpurनागपूर