शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मुलींना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्या  : निशा सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 21:44 IST

येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले.आबासाहेब खेडकर सभागृह येथे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य विभागाच्यावतीने विविध जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती पुष्पा वाघाडे, समाज कल्याण समिती सभापती दीपक गेडाम, माया कुसुंबे, सरिता रंगारी, शुभांगी गायधने, शकुंतला वरकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन प्रभारी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुरेखा चौबे यांनी केले. तर योगेश निकम यांनी आभार मानले.नवेगाव खैरी व फेटरीने पटकावले सर्वाधिक पुरस्कारविविध पुरस्काराच्या श्रेणीत आरोग्य केंद्र नवेगाव खैरी तसेच फेटरीने सर्वाधिक तीन पुरस्कार प्राप्त केले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथम पुरस्कार नवेगाव खैरी, द्वितीय टाकळघाट, तृतीय कोंढाळी, उपकेंद्रामध्ये प्रथम फेटरी, द्वितीय नवेगाव साधु, तृतीय महालगाव, ग्रामीण रुग्णालयामध्ये काटोल, आरोग्य सहायकामध्ये प्रमिला राऊत, पी. एस. घाटोल, छाया खारवे, आरोग्य सेविकांमध्ये ममता आत्राम, रंजना चंदनखेड, दुर्गा कावर्ती, मंगला गाडगे, उषा कांबळे व गीतांजली वैद्य, सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार अर्चना साखरकर व सारिका ठवकर, नाविन्यपूर्ण आरोग्य सखी पुरस्कार सरिता दुपारे, सुनिता वर्धे, भूमिता पहाडे, पूनम तिडके, आशागट प्रवर्तक पुरस्कार भूमिता भगत व श्यामलता बोरकर, सरला मस्के. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गिलानी, डॉ. आनंद गजभिये, डॉ. चेतन नाईकवार यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोहपा, मांढळ, कोंढाळी, तितूर, कविता बोंदरे, कांचन चंदनखेडे, एम. एस. अढावू, एस. झेड. परतेती, तारा नायडू, आरोग्य सेवक ए. एन.गेडाम, एस. के. नन्नावरे, वाय. व्ही. चंदनखेडे, चंद्रशेखर नागपुरे, बी. बी. खराबे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळघाट यास प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र मकरधोकडा, बेला, धापेवाडा, नवेगाव खैरी, भंडारबोडीला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दोन मुलींवर नसबंदी करणाऱ्या काजल अंबादास कोकर्डे व माधुरी सुरेंद्र मोहोड या दाम्पत्यास विशेष अर्थसाहाय्य देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य