शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसीच्या कामांचे १० सप्टेंबरपूर्वी कार्यादेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:17 IST

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देजि.प. सभागृहात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या निधीच्या विविध विकास कामांचे कार्यादेश १० सप्टेंबरपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते.समाजकल्याण विभागाने २०१८-१९ चा सर्व निधी खर्च केला असून, २०१९-२० चे सर्व नियोजन झाले आहे. या कामांचे बी १ निविदा काढून कामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य विभागाने जुन्या ३ आणि नवीन २ आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम केले आहे. १० कोटी रुपये डीपीसीने या विभागाला दिले होते. उपकेंद्र बांधकाम विस्तारीकरणासाठ़ी ३ कोटी देण्यात आले. मोडकळीस आलेल्या उपकेंद्राच्या इमारतींची दुरुस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देशही दिले. तसेच यंत्रसामुग्रीसाठी हाफकिन्सला दिलेले पैसे परत घेऊन त्या पैशातून रुग्णवाहिका घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. टंचाई विभागाला २० कोटी रुपये नागरी सुविधांसाठी दिले. पाणीपुरवठा विभागामार्फत मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचे सर्व कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. यासाठी प्राप्त झालेले १२ कोटी खर्च झाले. सिंचन विभागाला २०१८-१९ चा मिळालेला निधी पाझर तलाव दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला.बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरू आहेत. ७२ कामांपैकी २६ कामे शिल्लक आहेत. सर्व कामाचे कार्यादेश १० सप्टेंबरपर्यंत देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व रस्ते पावणेचार मीटरपेक्षा जास्त रुंदीचे असले पाहिजे, असेही सांगितले. महिला व बालकल्याण विभागाने ५ कोटी रुपये अंगणवाड्यांच्या व शौचालयाच्या बांधकामावर खर्च केले. सन २०१९-२० साठी ९ कोटी रुपये १४३ नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामावर खर्च केले जाणार आहेत.कृषी विभागाला देण्यात आलेल्या २०१८-१९ चा सर्व निधी योजनांवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यात विषबाधा प्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सर्वांना घरे २०२२ योजनेंतर्गत १०,८१५ घरे पूर्ण केली आहेत. कच्ची घरे असणाऱ्या नागरिकांना पक्की घरे देण्यात येणार आहेत. बी १ निविदा गटविकास अधिकारीस्तरावर काढून कामाचे कार्यादेश लवकरच देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेzpजिल्हा परिषद