शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना पावती द्या, कृपाल तुमाने यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:06 IST

शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.

ठळक मुद्दे लोकसभेत उपस्थित केला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना केव्हापर्यंत मुदत आहे, यासोबत विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खा. तुमाने यांनी नियम ३७७ अन्वये सदर मुद्दा उपस्थित केला. पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हे शासनाने नियुक्त केलेली बँक, कंपनीकडून पिकांचा विमा करतात. शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसेसुद्धा घेतले जाते; परंतु असे असताना त्यांना पावती दिली जात नाही. त्यामुळे विमा कालावधी पूर्ण झाला की नाही, हेसुद्धा शेतकऱ्यांना माहीत होत नाही. दुसरीकडे विमा संपल्यानंतर पुन्हा विमा कधी काढायचा, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असते.अशात पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही.शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी पैसे खर्च केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष देता पावती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी करीत विमा योजनेची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे मत तुमाने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरी