शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोरोनाने मृत्यू झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये भरपाई द्या

By सुमेध वाघमार | Updated: December 7, 2023 19:13 IST

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस : विधीमंडळावर पहिल्याच दिवशी तीन मोर्चांची धडक

सुमेध वाघमारे, नागपूर : विधीमंडळावर गुरुवारी पहिल्याच दिवशी तीन मोर्चांनी धडक दिली. कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या मनपा कर्मचाºयांना ५० लाख रुपये सानुग्रह भरपाई देण्याचा मुख्य मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने शेकडो कर्मचाºयांसह मोर्चा काढत लक्ष वेधले. बीड वरून आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच व नागपूरच्या समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटनेनेही आपल्या मागण्या रेटून धरल्या.

५४ कर्मचाºयांपैकी दोंघानाच मिळाले अनुदान कोरोना विरूद्ध लढ्यात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची योजना शासनाने जाहिर केली होती.  नागपुरात कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या मनपाच्या ५४ कर्मचाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु आतापर्यंत दोनच कर्मचाºयांना सानुग्रह सहाय्य मिळाले आहे. इतरांनाही तातडीने देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने विधीमंडळार हल्लाबोल मोर्चा काढला. 

धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मार्चाचे नेतृत्व बंटी शेळके व गोविंदभाई परमार यांनी केले. ‘सफाई कामगार एकता जिंदाबाद’चे नारे देत निघालेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेत एक कर्मचारी सहभागी झाला होता. मोर्चात बहुसंख्य कर्मचारी हातात खराटा घेवून होते. चौका-चौकात सफाई करून नारेही देत होते. मॉरीस कॉलेज टी पॉर्इंट चौकात मोर्चाला अडविण्यात आले. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.

या आहेत मागण्या

: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य देणे: लाड समिती शासन निर्णयानुसार ३० दिवसांत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे: मृत कर्मचाºयांच्या कुटुंबाला जुनी पेन्शन लागू करणे: सर्व एवजदार कर्मचाºयांना स्थायी करणे: शिक्षीत कर्मचाºयांची खुल्या वर्गात पदोन्नती देणे: श्रम साफल्य आवास योजनांतर्गत सफाई कर्मचाºयांना घर देणे, यासह इतरही मागण्या होत्या.

टॅग्स :congressकाँग्रेस