शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अन् नागवेषधारी मुली नागपूरच्या संविधान चौकात उभ्या झाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी संविधान चौकात नाग सापाचा वेष धारण केलेल्या मुलींना पाहून वाहतूकदार आश्चर्यात पडले होते. या नागवेषातील मुली येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होत्या. त्यांच्या वेषाप्रमाणे त्यांच्या हातात असलेले फलकही अंतर्मूख करणारे होते. ‘नाग किंवा इतर कुठलेही साप हे माणसांचे शत्रु नसून मित्र आहेत, त्यांना मारू नका, त्यांचे संरक्षण ...

ठळक मुद्देसापांना मारू नका, संरक्षण करा पीटा इंडियातर्फे जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी संविधान चौकात नाग सापाचा वेष धारण केलेल्या मुलींना पाहून वाहतूकदार आश्चर्यात पडले होते. या नागवेषातील मुली येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होत्या. त्यांच्या वेषाप्रमाणे त्यांच्या हातात असलेले फलकही अंतर्मूख करणारे होते. ‘नाग किंवा इतर कुठलेही साप हे माणसांचे शत्रु नसून मित्र आहेत, त्यांना मारू नका, त्यांचे संरक्षण करा’ हा संदेश त्यांच्या हातातील फलकावर होता. पीपल्स फॉर ईथीकल ट्रिटमेंट आॅफ अनिमल (पीटा) इंडियातर्फे राबविलेले हे जनजागृती अभियान सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले.पीटा इंडियाच्या राधिका सूर्यवंशी आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागपूरच्या कार्यकर्त्या करिश्मा गिलानी यांच्या नेतृत्वात सोमवारी संविधान चौक येथे हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. हिंदूस्थान विद्यालय, वर्धमाननगरच्या ममता शाहू व लक्ष्मी शाहू या नागवेषधारी विद्यार्थिनींनी वाहनचालक, वाटसरू आणि बसमध्ये बसलेल्या सर्वांचे लक्ष वेधले. यात स्वयंसेवक म्हणून उत्कर्षा पाटील व साक्षी तांबे यांनी सहकार्य केले.राधिका सूर्यवंशी यांनी सांगितले, नाग सर्प स्तनधारी प्राणी नाही. तो अंड्यातून निघाणारा प्राणी असून हे प्राणी कधीही दूध पीत नाही. उलट दूध पिल्याने त्याच्या आंतरीक अवयवांना नुकसान पोहचून मृत्यु ओढवू शकतो. मात्र धार्मिक कारणाने नाग दूध पितो असा निव्वळ भ्रम पसरविला गेल्याचे त्यांनी सांगितले. कधी मनोरंजनासाठी तर कधी धार्मिक कारणाने नागपंचमीच्या दिवशी लोकांना भ्रमिष्ट करण्यासाठी नाग सर्पाला पकडले जाते, त्यांचा फणा काढला जातो. ही सापावर होणारी हिंसा थांबयला हवी. त्यामुळे नागपंचमीला नागाला दूध पाजू नका आणि इतर कोणत्याही दिवशी सापांना मारू नका, हा संदेश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव