शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकानजीक दक्षिण एक्स्प्रेसमध्ये युवतीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:08 IST

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देपेन्ट्रीकार कर्मचाऱ्याचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपुरातील ११ युवक आणि ११ युवतींची चमू अमृतसर येथील क्रीडा स्पर्धेसाठी गेली होती. परत येताना ही चमू रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-७ ने दिल्ली ते नागपूर असा प्रवास करीत होती. यात नरखेड येथील एका युवतीचा समावेश होता. दरम्यान, सकाळी ६.३० वाजता या चमूतील नरखेडच्या मोवाड येथील रहिवासी असलेली युवती ललितपूर स्थानकावर शौचासाठी गेली. तेथे पेन्ट्रीकार कर्मचाºयाने तिची छेड काढली. संबंधित युवतीने याची माहिती आपले सहकारी आणि मोबाईलवर नातेवाईकांना दिली. याबाबत रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवरही सूचना देण्यात आली. नरखेडला दक्षिण एक्स्प्रेस थांबल्यानंतर संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती आहे. सायंकाळी ६.४५ वाजता दक्षिण एक्स्प्रेस नागपुरात प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. दरम्यान, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांचा शोध घेतला असता, ते पेन्ट्रीकार बंद करून निघून गेल्याचे आढळले. गाडीतील टीसीनेही पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांबाबत काहीच माहिती नसल्याची माहिती दिली. अखेर लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सुशील पांडे हे रात्री उशिरा महिला पोलिसांना सोबत घेऊन संबंधित युवतीचे बयान नोंदविण्यासाठी नरखेडला रवाना झाले.

टॅग्स :MolestationविनयभंगNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर