शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:48 IST

अल्पवयीन प्रियकराला पहाटे घरी बोलावून तो मनासारखा वागला नाही म्हणून प्रेयसीने त्याच्यावर ब्लेडचे घाव घातले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांनी आरोपी प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यामुळे ती घाबरली. कारवाईच्या भीतीने तिने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. एखाद्या टीव्ही सिरियलसारखी वाटणारी ही ‘रिल नव्हे तर रियल स्टोरी’ कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देनागपुरात  अजब प्रेम की गजब कहानी : दोघेही वाचले : प्रेयसीवर गुन्हा दाखल

लोकमतन्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन प्रियकराला पहाटे घरी बोलावून तो मनासारखा वागला नाही म्हणून प्रेयसीने त्याच्यावर ब्लेडचे घाव घातले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांनी आरोपी प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यामुळे ती घाबरली. कारवाईच्या भीतीने तिने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. एखाद्या टीव्ही सिरियलसारखी वाटणारी ही ‘रिल नव्हे तर रियल स्टोरी’ कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडली.कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, हर्ष (वय १७) आणि शुभांगी (वय १९) हे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. हर्ष ११ वीत शिकतो. तर शुभांगी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. त्यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्ष भेटायला, बोलायला टाळत असल्याचे ध्यानात आल्याने शुभांगीने त्याचा वेगवेगळ्या प्रकारे पाठलाग करणे सुरू केले. तो दाद देत नसल्याने त्यांच्यातील विसंवाद वाढला आहे. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास शुभांगीने हर्षला फोन करून घरी बोलविले. आत्ताच्या आता आला नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्यामुळे हर्ष तिच्या घरी पोहोचला. यावेळी तिने त्याला आधीसारखा का वागत नाही, अशी विचारणा केली. दोन्हीकडून एकमेकांबाबत नाजूक विषयावर विचारणा झाली अन् दोन्हीकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्यात वाद वाढला. दोघेही एकमेकांना दाद देत नसल्यामुळे वाद विकोपाला गेला. अचानक शुभांगी आक्रमक झाली. तिने जवळ ठेवलेले ब्लेड काढून हर्षच्या तोंडावर अनेक घाव घातले. या हल्ल्याने तो घाबरला. रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचला. पालकांना झालेली घटना सांगितल्यानंतर सकाळी कळमना ठाण्यात पोहचला. त्याने सांगितलेली माहितीवजा तक्रार ऐकून कळमना पोलिसांनी हर्षला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले तर शुभांगीच्या पालकांना निरोप पाठवून तातडीने तिला घेऊन कळमना ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, शुभांगी कळमना ठाण्यात आली. पोलीस आता आपल्यावर कारवाई करतील हे ध्यानात आल्याने ती घाबरली अन् तिने पोलीस ठाण्यातच स्वत:च्या हाताची नस ब्लेडने कापून घेतली.... अन् पोलीसही हादरलेया घटनेने पोलीस नुसते चक्रावलेच नाही. तर, अक्षरश: हादरले. एका तरुणीने पोलीस ठाण्यात स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. अधिवेशन सुरू असताना पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. पोलिसांची त्यात काही चूक नसली तरी या प्रकरणाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे ध्यानात आल्याने हादरलेल्या पोलिसांनी तिला कसे बसे आवरले आणि रुग्णालयात पाठविले. तत्पूर्वीच तिचा प्रियकर रुग्णालयातून उपचार घेऊन परतला होता. डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितल्यानंतर पोलिसांच्या जीवात जीव आला. हर्षने दिलेल्या तक्रारीवरून शुभांगीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार खुशाल तिजारे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट