शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीने केला माजी प्रियकराचा गळा आवळून खून; दुसऱ्या प्रियकराची घेतली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 21:50 IST

Nagpur News प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्यची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ मैल येथे सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्दे१४ मैल येथील घटना

नागपूर : प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्यची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ मैल येथे मंगळवारी (दि.२०) रात्री घडली असून, बुधवारी (दि.२१) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आराेपी प्रेयसीसाेबतच तिच्या प्रियकारास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली.

आझाद जमशेद शेख (२५, रा. वडचिचाेली, ता. पांढुर्ण, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृत पहिल्या प्रियकराचे नाव असून, अटकेतील आराेपींमध्ये ३० वर्षीय प्रेयसीसह तिचा दुसरा प्रियकर दिलीप काशिराम पटले (२८, रा. साेनबा नगर, खडगाव राेड, लावा, वाडी, ता. नागपूर ग्रामीण) या दाेघांचा समावेश आहे.

३० वर्षीय प्रेयसी ही उमरी, ता., जिल्हा रिवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ती १४ मैल, ता. नागपूर (ग्रामीण) येथील सचिन माकाेडे यांच्याकडे कुटुंबीयांसह किरायाने राहायची. आझाद १४ मैल येथील दुकानात काम करीत असल्याने ताे देखील सचिन माकाेडे यांच्याकडेच किरायाने राहायचा. एकाच घरातील वेगवेगळ्या खाेल्यांमध्ये दाेघेही किरायाने राहात असल्याने त्यांची आपसात ओळख झाली आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.

मध्यंतरी ती दिलीप पटलेच्या संपर्कात आल्याने त्या दाेघांचेही प्रेमसंबंध जुळले. याच कारणावरून आझाद व तिचे नेहमी भांडण व्हायचे. ती या भांडणाची माहिती दिलीपला द्यायची. त्या दाेघांनीही आझादला संपविण्याचा कट रचला. दाेघेही मंगळवारी रात्री त्याच्या खाेलीत गेले आणि त्यांनी त्याचा नाॅयलाॅन दाेरीने गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ताे बुधवारी सकाळी बराच वेळ हाेऊनही खाेलीतून बाहेर न आल्याने घरमालकाने त्याच्या खाेलीत झाकून बघितले. ताे मृतावस्थेत आढळून सेताच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शिवाय, त्यांनी संशयाच्या बळावर प्रेयसीला ताब्यात घेत विचारपूस केली. तिने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी दिलीप पटलेलाही अटक केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसाांनी आझादचा लहान भाऊ आफताब जमशेद शेख (२०, रा. वडचिचाेली) याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहेत.

भेटण्यास मनाई केल्याने भांडणे

आझाद हा सचिन माकाेडे यांच्या दुकानात दाेन वर्षांपासून काम करायचा. प्रेयसीचे दिलीप पटलेसाेबत सूत जुळल्याचे तसेच दाेघेही वारंवार भेटत असल्याची माहिती आझादला मिळाली हाेती. ताे तिला दिलीपला भेटण्यास मनाई करायचा. तिला ही मनाई मान्य नव्हती. याच कारणावरून दाेघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. त्यांच्या प्रेमसंबंध आणि भांडणांची माहिती इतरांनाही हाेती. हीच मनाई आझादच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी