शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल  : गिरीश व्यास यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 21:20 IST

आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

ठळक मुद्देसरकारची गती थांबली, मती भ्रष्ट झाली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनकाळात राज्यातील विकास योजना थांबविल्या जात आहेत. या सरकारची गती थांबली असून मती भ्रष्ट झाली आहे. आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.हे सरकार सुरू होण्याच्या अगोदरच गडगडण्याच्या स्थितीत आले आहे. सरकार आले तेव्हाच हे किती दिवस चालेल याची चर्चा जनतेमध्ये होती. ज्या पद्धतीने सरकारचे काम सुरू आहे त्यावरुन हेच दिसून येत आहे. आम्ही विकासाच्या कामाला गती देऊ, विचारपूर्वक काम करु, सरकारचे काम द्वेषपूर्ण राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र यांनी ज्या पद्धतीने विकासाच्या योजनांना थांबविण्याचे काम केले आहे त्यावरुन एकप्रकारे ते महाराष्ट्राच्या विकासाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आम्हाला आॅपरेशन कमळ राबविण्याची आवश्यकता नाही. कर्नाटकचे राजकारण सर्वांनी पाहिले. लोकशाही पद्धतीने तेथे निर्णय आला. आता ईव्हीएमबाबत कुणीही बोलत नाही. जनतेने तेथे भाजपाला कौल दिला आहे, असे ते म्हणाले.महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणूमहाविकास आघाडीने सत्ता सोडली तर निश्चित निवडणुकांना सामोरे जाऊ व एकट्याच्या ताकदीने सरकार स्थापन करून दाखवू. निवडणुकीची स्थिती आली तर आमची नेहमीच तयारी आहे, असा विश्वासदेखील गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासPoliticsराजकारणMediaमाध्यमे