नागपूर : जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नागपूर राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. जीएचआरसी, एनएसएस प्रोग्राम अधिकारी प्रा. मंगेश भोरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा दिली. साजिद हुसेन यांनी भाषण केले आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. अदिती शेवाळे, पूजा मदनकर आणि प्रीती भाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध बाबींची माहिती दिली. अथर्वा भालेराव यांनी सावित्रीबाई फुले यांची कविता म्हटली. जीएचआरसीई बीईटीआयसी लॅब प्रभारी डॉ. विभा बोरा यांनी कार्यक्रमाबद्दल मत व्यक्त केले. डॉ. संतोष जाजू यांनी प्रा. मंगेश भोरकर आणि एनएसएस सेलचे उपक्रम राबविण्यासाठी अथक परिश्रम केल्याबद्दल अभिनंदन कौतुक केले. प्रा. मंगेश भोरकर यांनी क्विझ स्पर्धा विजेती सृष्टी राजनहिरे आणि उपविजेते साजिद हुसेन यांचे अभिनंदन केले आणि विजेते व धावपटू यांना प्रमाणपत्रे व सावित्रीबाई फुले यांची पुस्तके प्रदान केली. संचालन अनिषा खैरकर यांनी केले. हृतिका खोलगडे यांनी आभार मानले. जीएचआरसीईचे संचालक डॉ. सचिन उंटवाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मंगेश भोरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. (वा.प्र.)
जीएचआरसीई, एनएसएस युनिटतर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST