शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गनी खान यांची एनडीएस पथकाला जिवे मारण्याची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 20:27 IST

साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देतहसील पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोन क्षेत्रातील रस्त्यावर ठेवलेल्या बांधकाम साहित्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह पथकातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गनी खान यांच्याविरुद्ध तक्रार गुन्हा दाखल केला.धोंडबा चौक, शीतला माता समाजभवनाजवळ वास्तव्यास असलेल्या गनी खान यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने दोन दिवसापूर्वी गनी खान यांना पथकाने नोटीस बजावली होती. ४८ तासात बांधकाम साहित्य हटविण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही साहित्य न हटविल्याने एनडीएसचे पथक सोमवारी सकाळी कारवाई करण्यासाठी पोहोचले. पथकाला बघताच गनी खान पथकातील जवानांच्या अंगावर धावून आले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पथकातील जवानांनी वीरसेन तांबे यांना माहिती दिली तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचताच गनी खान तेथून पसार झाले. पथकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १८६,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. मनपाचे अपर आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका