शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

नागपुरी संत्र्याला भौगोलिक नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 2:12 PM

Oranges Nagpur News विदर्भातील नागपूरी संत्रा प्रसिद्ध असल्यामुळे डॉ. पं. दे. कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रकाश नागरे आणि शशांक भराड यांच्या चमुने या संत्र्याला भौगोलिक नामांकन पाच वर्षांपूर्वी मिळवून दिले.

ठळक मुद्दे पीकेव्हीचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विदर्भ अ‍ॅग्रिकल्चर अँड अल्काईड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (वॅपको) या शिखर संस्थेस संलग्न असलेल्या श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीमार्फत ११ संत्रा उत्पादकांचा भौगोलिक नामांकनाचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे हस्ते बंगलोरच्या कायदेशीर सल्लागार झहेदा मुल्ला यांचेकडे पाठविण्यात आला.विदर्भातील नागपूरी संत्रा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि अद्वितीय आंबटगोड चवीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे डॉ. पं. दे. कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रकाश नागरे आणि शशांक भराड यांच्या चमुने या संत्र्याला भौगोलिक नामांकन पाच वर्षांपूर्वी मिळवून दिले. तदनंतर संत्रा उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी नोंदणी शुल्क जास्त असल्याने वैयक्तिक नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही.

ही बाब महाआॅरेंजचे राहुल ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे नामांकन शुल्क घटवून केवळ १० रुपये नाममात्र शुल्क आकारणीचे राजपत्र केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केले. नुकताच पीकेव्ही अकोला आणि विनलेक्सीसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये शासनाच्या आवाहनानंतर श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनी मार्फत ११ शेतकऱ्यांनी भौगोलिक नामांकन शुल्क, कायदेशीर सल्लागार शुल्क असे प्रती शेतकरी ३५५ रुपये प्रमाणे प्रस्ताव तयार करून विनलेक्सीस कंपनीच्या संचालक झहेदा मुल्ला यांचेकडे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे मार्फत पाठविण्यात आला आहे.

यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संत्र्याचे भौगोलिक नामांकन प्रमाणपत्र प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सातदिवे, काणे, संगेकर, श्रीराव व श्रमजीवीचे अध्यक्ष निलेश मगर्दे, रमेश जिचकार, प्रमोद कोहळे, सुभाष शेळके, विष्णू निकम, राजाभाऊ कुकडे, राजेंद्र कराळे, प्रफुल्ल सांबारतोडे, अमोल चोबीतकर आदी उपस्थित होते. या नामांकनामुळे वरुड-मोर्शीतील संत्र्याला राजाश्रय मिळणार असल्याची भावना आहे. 

टॅग्स :fruitsफळे