शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नागपूर शहरात निनादले गीतरामायणचे सूर :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तीमय सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:13 IST

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरांनी हिंदू नववर्षाच्या सकाळी भक्तीचा उत्साह लोकांमध्ये भरला. निमित्त होते संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचे.

ठळक मुद्देसंस्कार भारतीतर्फे विदर्भात संगीतमय महायज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, उगवलेली रम्य पहाट. याच वेळी गीतरामायणची मंजूळ गाणी निनादली आणि भक्तीचे सूर वातावरणात चहुबाजूने पसरले. शहरात सहा ठिकाणी हे स्वर एकाच वेळी उमटले. पहाटे सुरू होणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात मिसळलेल्या गीतरामायणाच्या स्वरांनी हिंदू नववर्षाच्या सकाळी भक्तीचा उत्साह लोकांमध्ये भरला. निमित्त होते संस्कार भारतीतर्फे गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचे.महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या साधनेने अजरामर झालेले ‘गीतरामायण’ म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विदर्भाच्या घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न संस्कार भारतीने चालविला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी यादरम्यान विदर्भात १५१ ठिकाणी संगीतमय गीतरामायणचे आयोजन केले जात आहे. शनिवारी शहरात सहा ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करून या महायज्ञाला सुरुवात झाली. या महायज्ञाचे औपचारिक उद्घाटन पावनभूमी, सोमलवाडा येथील बास्केटबॉल मैदानावर झाले. स्थानिक हनुमान सेवा मंडळाच्या सहकार्याने येथे हा कार्यक्रम झाला. सूरमणी प्रभाकर धाकडे गुरुजी यांच्याहस्ते या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या कांचन गडकरी, हनुमान सेवा मंडळाचे लक्ष्मणराव देशपांडे, महायज्ञाचे संयोजक गजानन रानडे, चंद्रकांत घरोटे, मनोज श्रुती, प्रसाद पोफळी, प्रवीण योगी, विवेक जुगादे, प्रकाश देवाळकर, दिनेश वंजारी, मोहन पारखी, समीर देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.हिंदू नववर्षाचा दिवस असल्याने पारंपरिक वेषात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष एकमेकांना शुभेच्छा देत होते. औपचारिक उद्घाटनानंतर कलावंतांनी गीतरामायणला सुरुवात केली. ‘कुशलव रामायण गाती..., दशरथा घे हे पायसदान..., राम जन्मला ग..., रामा चरण तुझे लागले..., स्वयंवर झाले सीतेचे..., निरोप कसला माझा घेता..., पराधीन आहे जगती..., सेतू बांधा रे..., गा बाळांनो श्री रामायण...’ अशा गीतरामायणमधल्या भक्तीमय रचना कलावंतांनी सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. संगीत संयोजक व गायक अमर कुळकर्णी, शशांक दंडे, रसिका बावडेकर, अमेय वैद्य, स्वप्निल हरदास, फाल्गुनी खाटीक या गायक कलावंतांसह आनंद मास्टे (किबोर्ड), प्रफुल्ल माटेगावकर (हार्मोनियम), मोरेश्वर दहासहस्र व राम ढोक (तबला) यांचा सहभाग होता. निवेदन सोनाली अडावदकर यांनी केले. यादरम्यान म्हाळगीनगर, राम मंदिर, रामनगर, तपस्या विद्यालय टी-पॉईंट मानेवाडा रिंग रोड, रवींद्रनगर, पाचलेगावकर महाराज मठ, चिंचभुवन, धंतोली उद्यान, त्रिमूर्तीनगर हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, जुना बाबुळखेडा या ठिकाणीही गीतरामायणाचे भक्तीस्वर निनादले. ७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नाईक तलाव बांगलादेश येथे तर बेलतरोडी, केशवनगर विद्यालय जगनाडे चौक, जयप्रकाशनगर, नरेंद्रनगर, लक्ष्मीनगर, लाकडीपूल महाल, स्नेहनगर, भरतनगर, पांडे ले-आऊट, सुभाषनगर, रमना मारोती दिघोरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.महारांगोळीने वेधले लक्षसोमलवाड्याच्या बास्केटबॉल मैदानावर हिंदू नववर्षाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या २०० कलावंतांनी ४००० चौ.फुटात रेखाटलेल्या महारांगोळीचे लोकार्पण यावेळी झाले. महारांगोळीची संकल्पना व आरेखन रोहिणी घरोटे, मोहिनी माकोडे, श्रीकांत बंगाले यांनी केले आहे. मतदार जागृती ही रांगोळीची मध्यवर्ती कल्पना आहे. ही महारांगोळी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होती. येणारा प्रत्येकजण ही रांगोळी न्याहाळत सेल्फीमध्ये कैद करीत होता. याशिवाय राजीव चौधरी व सहकाऱ्यांद्वारे ५०० चौ.फूट कॅनव्हासवर गीतरामायणाची गाणी  कॅलिग्राफीवर आरेखित केली जातील. १५१ ठिकाणी आयोजनपश्चिम विदर्भात अमरावती येथूनही शनिवारी गीतरामायणाच्या संगीतमय आयोजनाचा शुभारंभ झाला. संस्कार भारतीतर्फे नागपुरात ५२ ठिकाणी तर संपूर्ण विदर्भात १५१ ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. १३ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या महायज्ञात विदर्भातील प्रथितयश आणि नवोदित अशा १००० गायक, वादक व नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार आहे.

टॅग्स :Geetramayanगीतरामायणnagpurनागपूरgudhi padwaगुढीपाडवा