शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:01 IST

यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत.

ठळक मुद्देसंस्कार भारतीचे आयोजन : ‘गदिमा’ व सुधीर फडके यांना अनोखी स्वरांजली देणार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत. यात विदर्भातील सुमारे १००० गायक, वादक, नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार आहे. संस्कार भारतीतर्फे मागील १५ वर्षांपासून नववर्ष अभिवादनाप्रसंगी गीतरामायण प्रस्तुतीचा उपक्रम राबविण्यात येतो.विदर्भातील ११ जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये गीतरामायण कार्यक्रम केले जाणार असून त्यासाठी संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष सूरमणी डॉ. कमल भोंडे, कार्याध्यक्ष सुधाकरराव अंबुसकर, उपाध्यक्ष श्याम देशपांडे, प्रांत संयोजक गजानन रानडे, अमर कुलकर्णी, सहसंयोजक डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. जयश्री वैष्णव यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत नागपूर शहरातील ५१ ठिकाणी नृत्य, नाट्यमय गीतरामायण प्रस्तुतीचे आयोजन करण्यात येणार आहे. नवोदित गायक व वादकांसाठी ३ मार्च रोजी नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांचे वय ५० वर्षांच्या आत आहे अशा इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्कार भारतीच्या नागपूर शहर अध्यक्ष कांचन गडकरी, शहर मंत्री मनोज श्रोती यांनी केले आहे.

टॅग्स :GeetramayanगीतरामायणVidarbhaविदर्भ