शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

GBS Disease: काळजी घ्या! पुण्यानंतर जीबीएस नागपूरमध्ये पसरतोय हातपाय; 32 रुग्णांची नोंद

By सुमेध वाघमार | Updated: August 26, 2025 18:16 IST

महिन्याकाठी पाच रुग्ण : लक्षणे दिसताच उपचार घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) हा दुर्मीळ आजार असला तरी याचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये आठ महिन्यांत ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात ३ लहान मुले असून ३२ ते ६८ वयोगटातील रुग्ण आहेत. या आजारामध्ये मज्जातंतू हळूहळू निकामी होऊन रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार घेण्याचा सल्ला मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी दिला आहे.

मेडिकलमध्ये कोरोनानंतर महिन्याकाठी 'जीबीएस'चे एक ते दोन रुग्ण उपचारासाठी येत असताना आता ही रुग्ण संख्या सरासरी पाचवर पोहोचली आहे. 'जीबीएस' ही एक दुर्मीळ ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच परिधीय मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कधीकधी ते पूर्णतः निकामी होऊ शकतात. आजाराचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे व लक्षणे दिसताच उपचार घेणे आवश्यक आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोचालण्यास त्रास, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, हातापायांची ताकद कमी होणे, डायरिया, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास व श्वास घेण्यास त्रास होणे ही प्रारंभिक लक्षणे आहेत. हा आजार साधारणपणे पायांमधून सुरू होतो आणि हळूहळू वरच्या दिशेने पसरतो.

जीबीएसची गुंतागुंतश्वासोच्छवासाचा त्रास जीवघेणा असू शकतो. यासाठी व्हेंटिलेटरचा आधार घ्यावा लागतो. या आजारातून बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, काहींना रक्तदाबाचा चढउतार राहू शकतो. काहींच्या पायात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. आतड्याची हालचाल मंदावली जाऊ शकते किंवा लघवी रोखून धरली जाऊ शकते. जेव्हा सुरुवातीची लक्षणे अधिक गंभीर असतात तेव्हा हा आजार दीर्घकालीन व गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.

२० पुरुष १२ महिलांचा समावेशमेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागात जानेवारीमध्ये २, फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ९, जूनमध्ये ४, जुलैमध्ये ५ तर २२ ऑगस्टपर्यंत ५ असे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. यात २० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे.

तातडीने निदान व योग्य उपचार आवश्यक"'जीबीएस'च्या रुग्णांनी लवकर निदान करून योग्य उपचार सुरू केल्यास त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. उपचारांमध्ये साधारणपणे 'इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन' आणि 'प्लाज्माफेरेसिस' याचा वापर केला जातो. हे दोन्ही उपचार मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. सध्या एक रुग्ण 'प्लाज्माफेरेसिस'वर आहे. 'जीबीएस'वरील उपचार महागडा असलातरी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना मोफत दिला जातो."- डॉ. अतुल राजकोंडावार प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर