शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक-ट्रान्सजेंडर यांनी नागपुरात वाटली मिठाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 10:11 IST

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देढोलताशाच्या गजरात स्वागतन्यायालयाच्या निर्णयाचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने समलैंगिकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. या निर्णयाने समलैंगिकता आता गुन्हा ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावताच विदर्भातील समलैंगिक आणि ट्रान्सजेंटर तसेच या लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालय परिसरात असलेल्या सारथी ट्रस्टच्या कार्यालयासमोर सायंकाळी सर्वांनी एकत्र येऊन जल्लोष केला. केक कापला तसेच ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला. न्यायालयाच्या या निर्णयाने एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर होता.सारथी ट्रस्ट ही एक कम्युनिटी बेस्ड आॅर्गनायझेशन असून, ती समलैंगिक आणि ट्रान्सजेंडरसाठी काम करते. ही संस्था अशा लोकांच्या एचआयव्ही आणि एड्स समस्यांसह त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही काम करते.

न्यायलयाने दिलेला निर्णयामुळे आम्हाला गर्व वाटू लागला आहे. अनेक वर्षांची लढाई आम्ही जिंकलो आहोत. आज आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे.- सीईओ, सारथी ट्रस्ट

न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप आनंद झाला आहे. विदर्भात जवळपास दीड हजारावर असे लोक आहेत, परंतु ती आपली ओळख लपवून आहेत. सारथी अशा लोकांसाठी काम करते. समाज व कायदेशीर मान्यता नसल्याने असे लोक आपली ओळख लपवून राहत आहेत. परंतु न्यायालयाच्या या निर्णयानंतर लोक उघडपणे समोर येतील.- कुणाल मैंद, अ‍ॅडोकेसी आॅफिसर

आम्ही १९९७ पासून यासाठी लढा देत आहोत. आम्ही जो त्रास सहन केला तो येणाऱ्या पिढीला या निर्णयाने होणार नाही. परंतु अजून खूप काम करायचे आहे. आमच्या लोकांना येणाऱ्या समस्यांसाठी आम्ही लढत राहणार. न्यायालयाच्या या निर्णयाने खूप आनंद झाला असून, आज खऱ्या अर्थाने समलैंगिकांना न्याय मिळाला आहे.

- विद्या कांबळे

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGay Marriageसमलिंगी विवाह