शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:23 IST

भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. भिवापूर शहरातील काही भागासह नऊ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तिथे गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

ठळक मुद्दे२२ जणांवर उपचार सुरू : भिवापूरसह १० गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. भिवापूर शहरातील काही भागासह नऊ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तिथे गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.गॅस्ट्रोची लागण झालेल्या गावांमध्ये भिवापूर शहरातील धर्मापूर व तास या भागासह तालुक्यातील भागेबोरी, किन्हाळा, साठगाव, जवराबोडी, वडध, नक्षी, भुयार, किन्ही (खुर्द) व गाडेघाट या गावांचा समावेश आहे. नीलिमा गोपाल चौधरी (१७) व करण राजेंद्र चौधरी (१२) दोघेही रा. भागेबोरी, सानिया कमलाकर गजभिये (१२, रा. कोलारी), शुभम दामोधर फुलझेले (१९), तुळसाबाई रामचंद्र पिल्लेवान (७०) व हरिभाऊ तुकाराम पाचभाई (६५) तिघेही रा. भिवापूर, आर्यन खुशाब नागोसे (१०) व निशा अरुण नारनवरे (२५) दोघेही रा. तास (भिवापूर), अंजली घनश्याम गोवर्धन (८) व शांता प्रल्हाद धनविजय (७०) दोघेही रा. धर्मापूर (भिवापूर), सुषमा राजू कुरूटकर (२८, रा. किन्हाळा), अभय रमेश भुसारी (३३, रा. साठगाव), माला अंबादास वानखेडे (४५, रा. किन्ही), रुचिता छबिलाल वानखेडे (१६, रा. किन्ही खुर्द), राजेंद्र कोठीराम मेश्राम (३५), आशू अमृत वैद्य (१२), अमित खुशम पडोळे (२०) व सायली अमृत वैद्य (१५) सर्व रा. जवराबोडी, लीलाबाई चंद्रभान वराडे (६५, रा. वडध), धर्माबाई राजेंद्र कावळे (८४, रा. भुयार), रोहीत विलास दहीवले (१२, रा. नक्षी) आणि कपिल गेडाम (२५, रा. गाडेघाट) यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील काहींना सुटीही देण्यात आली. हरिभाऊ पाचभाई यांना मात्र नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.या गावांमध्ये मंगळवार (दि. १७) पासून गॅस्ट्रोची लागण झाली असून, तेव्हापासूनच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल व्हायला सुरुवात झाली. तास, मोखाळा व जवराबोडी या तीन गावांसाठी  पेयजल योजनेंतर्गत एकमेव पाणीपुरवठा योजना असून, ती सध्या निर्माणाधीन आहे. त्या योजनेसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लगतचे घाण व दूषित पाणी नळाला येत असल्याचा आरोप जवराबोडी येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, अन्य गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत किंवा पाण्याच्या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालय ‘आॅक्सिजन’वरतालुक्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमधील रुग्ण उपचारासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत असून, सध्या या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे संपूर्ण रुग्णांचा भार एका परिचारिकेला सहन करावा लागत असून, सध्या त्यांना २४ तास कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यांनाही सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर