शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी पार्क, उद्यानांचे संरक्षण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 01:22 IST

माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी नोंदवले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे निरीक्षण : ही संपत्ती वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले

  लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी नोंदवले.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीचे टेंडर उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्या निर्णयात न्यायालयाने हिरवळीच्या महत्त्वावर भूमिका मांडली. नागरिक मोठ्या संख्येत शहरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहरे सतत फुगत आहेत. त्यांचे झपाट्याने सिमेंटच्या जंगलांमध्ये परिवर्तन होत आहेत. आधी हिरवेगार असणारे परिसर नाहिसे होत चालले आहेत. सध्या नागरिकांना शरीर व मनावरचा ताण हलका करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागत आहे. याशिवाय लोकसंख्या वेगात वाढत आहे. लोकसंख्येसोबत वाहने वाढत आहे आणि वाहनांसोबत प्रदूषणामध्ये भर पडत आहे. आधी मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होती. आता मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी मैदाने नाहीत. नागरिक जास्तीतजास्त वेळ घरात व कामाच्या ठिकाणी राहतात. त्यानंतर त्यांना काही क्षणाकरिता मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, फिरण्यासाठी, एकत्र होण्यासाठी, मन ताजे करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असते. त्यामुळे पार्क व उद्यानांचे संरक्षण अत्यंत आवश्यक झाले आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.अन्य महत्त्वाचे मुद्दे१ - पार्क व उद्याने मानवी वस्तीची फुफ्फुसे असतात. ती सुदृढ आरोग्य प्रदान करतात. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवतात. शहराला सौंदर्य प्रदान करतात.२ - नैसर्गिक साधने देशाची संपत्ती असतात. ही संपत्ती नवीन पिढीला कमी करून नाही तर, वाढवून दिली गेली पाहिजे. ही संपत्ती सर्वात मौल्यवान आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयenvironmentपर्यावरण