शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलन वाहनांतूनच कचरा रस्त्यावर विखूरला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

- ओव्हरलोडमुळे कचरा घरादारापर्यंत उडतो लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील घराघरांतून कचरा संकलित केल्यानंतर भांडेवाडी डम्पिंग यार्डापर्यंत तो ...

- ओव्हरलोडमुळे कचरा घरादारापर्यंत उडतो

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील घराघरांतून कचरा संकलित केल्यानंतर भांडेवाडी डम्पिंग यार्डापर्यंत तो कचरा वाहून नेणारी वाहने नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण करत आहेत. अर्ध्याअधिक कचरा डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचण्याआधीच तो रस्त्यावर विखुरला जात असल्याचे चित्र आहे.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. एजी व बीव्हीजी या कंत्राटी कंपन्यांची वाहने हा कचरा घरादारातून संकलित केल्यानंतर पूर्व नागपुरात असलेल्या भांडेवाडी डम्पिंग यार्डात फेकतात. मात्र, यादरम्यान येणाऱ्या वाठोडा परिसरातील वस्ती संकलन वाहनांच्या बेमुर्वतपणामुळे त्रस्त आहेत. या कंपन्यांची वाहने कचरा गरजेपेक्षा जास्त भरत असल्याने मार्गात कचरा उडवत जातात. वाहनातील कचरा उडून इतस्तत: पसरतो. बरीच वाहने ताडपत्रीने तो कचरा झाकत नसल्याचेही चित्र आहे. यासोबतच काही वाहनांना भगदाड पडले असल्याने कचरा रस्त्यावरच पडत जातो. त्यामुळे ही वाहने कचरा संकलन करणारी आहेत की कचरा पसरवणारी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

------------------

या वाहनांवर दंड लावावा

कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये कचरा गरजेपेक्षा जास्त भरला जातो आणि नंतर हा कचरा रस्त्यावरच विखुरला जातो. त्यामुळे, रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नंतर हा कचरा साफही केला जात नाही. मनपा प्रशासनाने या वाहनांवर दंड लावण्याची गरज आहे.

- गौरव गुप्ता, युवा समाजसेवक, सूरजनगर

------

वाहनांचा वेगही भरपूर असतो

कचरा संकलन करणारी ही वाहने अत्यंत वेगाने धावतात. त्यानंतर हा कचरा थेट घरादारापर्यंत उडून येतो. अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, लक्ष देणारी यंत्रणा झोपेत असल्याचे दिसून येते.

- मुज्जू शेख, धरतीमातानगर

--------------

आधीच रिंग रोड ते डम्पिंग यार्डापर्यंतचा रस्ता अनेक खड्डे पडलेला आहे. या रस्त्यावरून वॉटर टँकर्स मोठ्या संख्येने धावतात. त्यामुळे चिखल असतोच. त्यात कचरा रस्त्यावर विखुरल्याने दुर्गंधी कायम असते.

- पप्पू शाहू, संघर्षनगर

------------------

वाहनांचा आवाजही मोठा

ही वाहने थकलेली आहेत. शिवाय, रस्ता खराब असल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचा आवाजही फार मोठा असतो. दुरुस्ती केली तर कचरा रस्त्यावर पसरणार नाही आणि आवाजही होणार नाही.

- अनिकेत कोंडेकर, पवनशक्तीनगर

------------

वाहनचालक अरेरावी करतात

बरेचदा वाहने हळू चालवा आणि कचरा उडणार नाही, अशी ताकीद देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, वाहन चालक अरेरावी करतात आणि पुढे निघून जातात.

- अकिल शेख, पवनशक्तीनगर

.............