शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळा; चौकशी करून अहवाल द्या : मनपा आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:42 IST

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांकडून कचऱ्याच्या नावाखाली ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देकंपन्यांना आरोग्य विभागाने बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांकडून कचऱ्याच्या नावाखाली ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.कचऱ्यात माती व दगड आणल्या प्रकरणात संबंधित कंपन्यांना दोन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आमदार विकास ठाकरे व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे रविवारी सकाळी धाड घातली. ट्रकमध्ये कचऱ्याऐवजी मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आणले जात असल्याचे रंगेहात पकडले. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याने दोषींवर पोलिसात गुन्हा दाखल करून संबंधित कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.महापालिकेतील कचरा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर कचरा संकलन करणाऱ्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांवर बडतर्फच्या कारवाईची टांगती तलवार आहे. आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कंपन्यांचे कंत्राट रद्द होण्याची शक्यता आहे.महापालिकेने दोन कंपन्यांना शहरातील कचरा संकलन करण्याची नोव्हेंबर २०१९ मध्ये जबाबदारी दिली. दहा वर्षासाठी करार केला. पाच-पाच झोन विभागून दिले. दरम्यान, कंपन्यांकडून कचऱ्यात माती मिसळली जात असल्याच्या अनेक तक्रारीदेखील महापालिकेला प्राप्त झाल्या. प्रशासनिक स्तरावर त्याची शाहनिशा झाली. वेळोवेळी आरोग्य विभागाकडून कंपन्यांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ५९ गाड्यांचे क्रमांक काढण्यात आले आहेत. त्यानंतरही या कंपन्यांकडून महापालिकेची आर्थिक लूट सुरूच आहे.पोलीस चौकशीतून गैरप्रकार उघड होतीलकचरा घोटाळा प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीतून गैरप्रकार उघडीस येईल. परंतु कंपन्यांना बडतर्फ केल्यास शहरात कचरा संकलनाची समस्या निर्माण होऊ शकते. नवीन निविदा प्रक्रिया राबविणे आणि कंपन्या नियुक्त करणे याला बराच मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे, कंपनीच्या कारभाराची सखोल चौकशी करून पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न