शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:00 IST

कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही.

ठळक मुद्देकामाच्या दिवसांमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही.बीव्हीजीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आम्हाला २६ दिवस काम देण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु लॉकडाऊनमुळे काम नसल्याने कर्मचाºयांना २० ते २२ दिवसांचे काम देण्यात येत होते. संबंधीत प्रकरणात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु सफाई कर्मचारी आपल्या मागण्यांवर अडून बसले आहेत. विशेष बाब म्हणजे कचरा संकलनाला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यावश्यक सेवेच्या श्रेणीत ठेवले आहे. सोमवारी आंदोलन करण्यापुर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा सूचना प्रशासनाला दिली नाही. त्यांनी अचानक काम बंद केले. अशा स्थितीत अ‍ॅपिडॅमिक अ‍ॅक्टनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कठोर पाऊल उचलल्या जाऊ शकते. कामगार आयुक्तांकडे हे प्रकरण जाणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीव्हीजी कंपनीत ९५६ कर्मचारी कार्यरत आहेत. वरिष्ठ कर्मचाऱ्यांना २६ दिवसांच्या जागी २२ ते २४ दिवसांचे काम आणि नव्या कर्मचाऱ्यांना २० ते २२ दिवसांचे काम देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. कंपनीचे अमोल माने यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे काम कमी झाले आहे. त्यामुळे कामाच्या दिवसात कपात करण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेऊन कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. कोणतीच सूचना न देता कर्मचारी संपावर गेले आहेत. कचरा संकलन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतर पुढील पाऊल उचलण्यात येईल.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर