शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या नागपूर शहरातील कचरा संकलन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:57 IST

कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्या एक ते पाच झोनमधील म्हणजेच अर्ध्या शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्या एक ते पाच झोनमधील म्हणजेच अर्ध्या शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते.महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत. यातील एजी एन्व्हायरो एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे कामगार त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्यातही दोन वेळा कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु त्यानंतरही कामगारांना न्याय मिळालेला नाही. यामुळे त्रस्त कामगारांनी वाठोडा येथील एजी एन्व्हायरो एजन्सीच्या कार्यालयापुढे धरणे दिले. संपामुळे पाच झोन क्षेत्रातील कचरा संकलन ठप्प झाले आहे.दरम्यान, अमोल गायकवाड, गौरव मेश्राम, विश्वजीत तांबे आदींच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सिव्हिल लाईन्स परिसरात पोहचले असता सदर पोलिसांनी दहा कामगारांना ताब्यात घेतले. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना एजन्सीने दडपशाहीचे धोरण स्वीकारल्याने संप पुकारल्याची माहिती अमोल गायकवाड यांनी दिली.दीड महिन्यात तिसऱ्यांदा आंदोलनकामगार कपात व कमी वेतन देण्याच्या विरोधात कामगारांनी मे महिन्यात दोनदा आंदोलन केले. परंतु न्याय न मिळाल्याने संप पुकारल्याची माहिती कामगारांनी दिली. कोविड-१९ मध्ये जीवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी काम करीत आहेत. परंतु एजन्सीकडून शोषण सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत संपावर तोडगा निघाला नव्हता. एजन्सीला यावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नStrikeसंप