शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रामबागमध्ये गँगवॉर : नागरिक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:46 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

ठळक मुद्दे गुंडांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष : प्रतिस्पर्ध्याच्या घरावर सशस्त्र हल्ले : वाहनांची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.रामबाग मैत्री बुद्धविहाराजवळ राहणारा कुख्यात गुंड भिकू राजा परचाके याने चार दिवसांपूर्वी त्याचा प्रतिस्पर्धी गुंड पलाश वासनिक याच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला होता. त्यावेळी पलाश वाचला. दुसऱ्या दिवशी परचाकेच्या गुंडांनी पुन्हा हैदोस घातला. त्याचा बदला घेण्यासाठी कुख्यात पलाश वासनिक, सनी चव्हाण, विकी दाभाडे आणि त्याच्या सशस्त्र साथीदारांनी बुधवारी मध्यरात्री भिकू परचाकेच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या घराचे दार तोडून भिकूला मारण्याचा प्रयत्न केला. भिकूची पत्नी उषा परचाके पुढे आली असता आरोपीने तिच्या अंगावरून तलवार फिरवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यात ती जखमी झाली. तीन दिवसांपासून एकमेकांच्या घरावर हे गुंड हल्ले चढवत असल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी येथे बंदोबस्तही लावला आहे; मात्र त्याला न जुमानता गुंडांच्या या दोन्ही टोळ्या एकमेकांना धडा शिकविण्याच्या प्रयत्नात दहशत निर्माण करीत आहे. दरम्यान, उषा परचाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पलाश वासनिक याच्या तीन साथीदारांना अटक केली. पलाश मात्र फरार झाला. तर त्यापूर्वीच्या गुन्ह्यात आरोपी भिकू परचाके याचे ७ गुंड साथीदार पोलिसांच्या अटकेत आहेत. भिकू मात्र फरार आहे.तोडफोड, नुकसान भरपाई कोण देणार?तलाश आणि त्याच्या गुंड साथीदारांनी परिसरातील २० वाहनांची तोडफोड केली. गुंडांच्या टोळ्या आपला राग निरपराध नागरिकांच्या वाहनावर काढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. हे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर