शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

'गंगा-जमुना प्रकरण' जनहित याचिकेत परिवर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा-जमुना वस्तीचे संरक्षण आणि येथे देहविक्री करणाऱ्या महिलांचे मूलभूत अधिकार यासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले. 

ठळक मुद्देउच्च न्यायालय : राज्य सरकारला मागितले उत्तर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा-जमुना वस्तीचे संरक्षण आणि येथे देहविक्री करणाऱ्या महिलांचे मूलभूत अधिकार यासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले. तसेच राज्याच्या गृह विभागाचे सचिव, पोलीस आयुक्त व लकडगंज पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून यावर येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

सोनबाजीनगर येथील व्यावसायिक मुकेश शाहू यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने याचिकेतील मुद्दे गंभीरतेने घेऊन यावर व्यापक विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आणि या प्रकरणावर जनहित याचिका म्हणून सुनावणी करण्याचा निर्णय दिला.

पोलीस आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी करून गंगा-जमुना वस्तीमध्ये देहविक्री व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. कायद्यानुसार, धार्मिकस्थळे, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, रुग्णालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणांपासून २०० मीटर परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करता येत नाही. गंगा-जमुना वस्तीपासून बालाजी मंदिर, चिंतेश्वर मंदिर, बाबा कमलीशाह दर्गा, दुर्गा देवी मंदिर, शारदा देवी मंदिर, राधा स्वामी सत्संग, चिंतेश्वर हिंदी प्राथमिक शाळा व हिंदुस्थान उच्च माध्यमिक विद्यालय २०० मीटरच्या आत आहे. त्यामुळे गंगा-जमुना वस्तीमध्ये देहविक्री व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. चंद्रशेखर साखरे यांनी बाजू मांडली.

देहविक्री व्यवसाय गुन्हा नाही

अधिसूचित नसलेल्या परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करणे गुन्हा नाही. त्यामुळे पीडित महिला गंगा-जमुना वस्तीमध्ये राहून इतर ठिकाणी देहविक्री व्यवसाय करू शकतात. करिता, गंगा-जमुना येथील त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून गुन्हे नोंदविता येणार नाही. गंगा-जमुना वस्ती नको असेल तर, येथील महिलांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्यात यावे. परंतु, गंगा-जमुना वस्ती सील करून येथील महिलांचे मूलभूत अधिकार वेशीला टांगू नये, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी