शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

‘इन्स्टाग्राम’वरून फसवणूक करणारी गँग जेरबंद, ५८ लाख रुपये जप्त

By योगेश पांडे | Updated: March 13, 2023 20:56 IST

Nagpur News ‘इन्स्टाग्राम पेज’च्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढून परताव्याच्या नावाखाली फसवणूक करणारी गँग जेरबंद करण्यात आली आहे.

नागपूर : ‘इन्स्टाग्राम पेज’च्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढून परताव्याच्या नावाखाली फसवणूक करणारी गँग जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नागपुरातील दोन तरुणांची फसवणूक झाल्यानंतर या टोळीवर कारवाई करण्यात आली असून यामागे आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

साहील विनोदसिंह चव्हाण (२४, हिंगणा मार्ग) याचे ‘इन्स्टाग्राम’वर ‘विक्रांत एक्सचेंज’ नावाच्या पेजवर तीन दिवसांत तीन टक्के परताव्याची जाहिरात पाहिली. त्याने त्याचा मित्र शुभम काळबांडे यालादेखील यासंदर्भात माहिती दिली. दोघांनीही फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन स्वरुपात यात रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर साहीलला विक्रांत एक्सचेंजमधून एका व्यक्तीचा फोन आला व आणखी पैसे आमच्या खात्यात टाकले नाही तर तुमचे अगोदरचे सर्व पैसे बुडतील अशी धमकी देण्यात आली. दोघांनीही ऑनलाईन पैसे दिले तसेच रोहित पटेल नावाच्या व्यक्तीकडे रोख असे एकूण १० लाख ९० हजार रुपये दिले. मात्र तरीदेखील आणखी पैसे द्या, अन्यथा पैसे बुडतील अशी धमकी देण्यात आली.

अखेर साहीलने राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शुभमसोबतदेखील असाच प्रकार होत होता. समोरील व्यक्ती फोनवरूनच सूचना देत होते. ११ मार्च रोजी त्याने सांगितल्याप्रमाणे शुभम क्वेटा कॉलनी येथे पैसे घेऊन गेला. तेथे शहर पोलिसांचे एक पथकदेखील गुप्तपणे पोहोचले होते. अगोदर क्वेटा कॉलनीत विक्रांत एक्सचेंजचे दोन व्यक्ती आले व त्यानंतर आणखी एक व्यक्ती रक्कम घेण्यासाठी आला. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले व गायत्रीनगर, क्वेटा कॉलनी येथे पोलीस पोहोचले. तेथे काही लोक रोख नोटा पैसे मोजण्याच्या मशीनवर मोजत होते. पोलिसांनी तेथून ५८ लाख ३६ हजार रुपये जप्त केले. याशिवाय पैसे मोजण्याच्या दोन मशीन व सहा मोबाईल जप्त करण्यात आले. परिमंडळ एकचे उपायुक्त अनुराग जैन, परिमंडळ तीनचे उपायुक्त गोरख भामरे, सहायक पोलीस आयुक्त अशोक बागुल, राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश काळे, हरीष बोराडे, अमिता जायपुरकर, गणेश मुंढे, दिगंबर पठाडे, वैभव यादव, गौरव पाटील, अश्वीन चौधरी, विजय तिवारी, किरण शेजवळ, चेतन चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुजरात, मुंबई ‘कनेक्शन’पोलिसांनी या प्रकरणात एकूण नऊ आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यात रोहीत पटेलसह अर्जुन चंदुभा राठोड (२३, गिरसोमनाथ, गुजरात), धर्मेंद्र अकोबा वाला (२१, गिरसोमनाथ, गुजरात), निलेशकुमारमनुप्रसाद दवे (३६, पाटण, गुजरात), विष्णू क्रिष्णादास पटेल (५८, पाटण, गुजरात), विरमसिंग जयवंतसिंग राठोड (२५, सोमनाथ, गुजरात), विक्रमसिंह धनाजी वाघेला (२१, पाटण, गुजरात), जोरुबा जेलुसी वाघेला (५१, पाटण, गुजरात) यांचा समोवश आहे. सर्व आरोपी बाहेरील राज्यातील असुन ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून गुन्हा करीत होते. पैसे डुबणार अशी भिती घालून ते लोकांना ब्लॅकमेल करायचे व आणखी रक्कम घ्यायचे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी