शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:12 IST

भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी चौघेही ट्रकचे चालक आणि वाहक असून, यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदानमधील घृणास्पद प्रकारदोघे ताब्यात तर अन्य दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी चौघेही ट्रकचे चालक आणि वाहक असून, यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.बलात्कारानंतर कुणाकडेही वाच्यता होऊ नये आणि आपले पाप लपविण्यासाठी या नराधमांनी ‘त्या’ महिलेला दगडाने ठेचले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारात पीडित महिलेचे दोन्ही डोळेसुद्धा बलात्काऱ्यांनी फोडले. तिला जीवे मारण्याचा प्रकार केला. सुमारे अर्ध्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे ही बाब उजेडात येताच सर्वत्र धावपळ सुरू झाली.अत्यंत निर्जनस्थळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या तट्ट्यांच्या शौचालयात हा किळसवाणा प्रकार घडला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, तिच्यावर तातडीने वेकोलि येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे ध्यानात येताच, लागलीच वेकोलि येथून तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.शेतकरी कुटूंबातीलवेकोलि उमरेड क्षेत्रांतर्गत गोकुल खदान येते. सुमारे तीन वर्षांपासून ही खदान या क्षेत्रात सुरू झाली आहे. पीडित महिला मूळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलित समाविष्ट केल्यानंतर सदर महिलेला वेकोलि येथे नोकरी मिळाली. सुमारे एक वर्षापासून गोकुल खदान येथे ‘धर्मकाँटा’ करण्याच्या स्थळी लिपिक पदावर कार्यरत होती.वृद्ध चालकाची सतर्कतानेहमीप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर या महिलेने दुपारच्या सुमारास भोजन केले. त्यानंतर ती सुमारे ४०० फुटावर असलेल्या शौचालयाकडे लघुशंकेसाठी गेली. अशातच तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या चौघांनी तिचा पाठलाग केला. तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान पाऊस सुरू असल्याने आणि कार्यालय ते शौचालय अंतर लांबचे असल्याने कुणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. पाऊस थांबताच काही वेळेनंतर एक वृद्ध ट्रकचालक या परिसरातून जात असताना महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. शौचालयाकडे धाव घेताच अतिशय गंभीर परिस्थितीत रक्तबंबाळ अवस्थेत महिला विव्हळत होती. लागलीच या वृद्धाने कार्यालयाकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला.नराधम होते दडूनघटना लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अशातच दोघेजण संशयास्पद अवस्थेत ट्रकमध्ये दडून असलेले कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले. कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोन्ही जणांचे शर्ट रक्ताने माखलेले होते. अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाल्याचीही बाब उघडकीस आली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार