शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:03 IST

मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त जमावाने त्यांची बेदम धुलाई केली. नंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी दुपारी ४ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे वाठोडा, नंदनवन परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देरंगेहात सापडले दोन आरोपी : जमावाकडून बेदम धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त जमावाने त्यांची बेदम धुलाई केली. नंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी दुपारी ४ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे वाठोडा, नंदनवन परिसरात तणाव निर्माण झाला होता.पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्या परिवाराची आर्थिक अवस्था बेताची आहे. चरितार्थ चालविण्यासाठी आईवडील गावोगावी जातात. मुलगी सध्या काकांच्या आश्रयाला आहे. बुधवारी काकांकडे पाहुणे आल्यामुळे त्यांना घेऊन ते नंदनवनमध्येच राहणाऱ्या  दुसऱ्या  नातेवाईकांकडे गेले होते. दुपारी ४ ला परत आले तेव्हा त्यांना त्यांची पुतणी घरी दिसली नाही. ती बराच वेळेपासून घराबाहेर असल्याचे ध्यानात आल्यामुळे त्यांनी शेजारी चौकशी केली असता वस्तीत राहणारा आरोपी विनोद नरसिंग तांडी (वय १९) याच्या घरात असल्याचे एकाने सांगितले. त्यानुसार काका तांडीच्या घरी गेले. तेथे बाहेरच्या खोलीत शुभम ऊर्फ रितिक श्रीराम गंगाभोईर (वय १८, रा. वाठोडा) हा बसून दिसला. काकाने त्याला पीडित मुलीबाबत विचारणा केली तेव्हा आरोपी तांडी आतल्या खोलीतून नको त्या अवस्थेत बाहेर येताना दिसला. ते पाहून काकांनी पीडितेला आवाज दिला असता ती पण तशाच अवस्थेत बाहेर आली. तिने सांकेतिक भाषेत आरोपी तांडीने अत्याचार केल्याचे काकांना सांगितले. त्यामुळे काकांनी शेजाऱ्यांना गोळा करून हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त शेजाऱ्यांनी आरोपी तांडी आणि गंगाभोईर या दोघांचीही बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपींना अटक केली.अनेकदा केला अत्याचारमुलीचे पालक अनेकदा दिवसा घरी नसतात. ती संधी साधून आरोपी तिला नेहमी आपल्या घरात न्यायचे आणि तिच्यावर अत्याचार करायचे, अशी माहिती आता पुढे आली आहे. मुलगी मूकबधिर असल्याने आरोपीचे पाप आतापर्यंत उघड झाले नव्हते. बुधवारी दुपारी ते रंगेहातच पकडले गेले. त्यामुळे त्यांचे पाप चव्हाट्यावर आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार